7.1 C
New York

Ashok Chavan : मला संपवू नका, तुम्ही..; अशोक चव्हाण असं का म्हणाले?

Published:

राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच काँग्रेसमधून भाजपचात गेलेले खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीयं. मला संपवू नका मीच राहिलो नाही तर तुम्ही बोलणार कोणावर? असं विधान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी टीकाकारांना उद्देशून केलंय. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

काँग्रेसची साथ सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राज्यसभेत खासदारकी बहाल करण्यात आली. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून चव्हाण यांची ओळख होती. मात्र, त्यांनी असा भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. याच टिकेला प्रत्युत्तर म्हणून अशोक चव्हाणांनी हे विधान केलंय.

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, विकासात्मक कामं करण्यासंदर्भात ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा करण्यासाठी अशोक चव्हाण सदैव तुमच्याबरोबर आहे, हे जाहीरपणे मी सांगतो. काही मतभेद नाहीत. पण माझ्या उणीवा लांबलचक यादी करून… हे अशोक चव्हाणमुळे… हे अशोक चव्हाणमुळे; माझे नाव घेतल्याशिवाय काही जमतच नसल्याचं चव्हाण म्हणाले आहेत.

बारामतीचं तिकीट कुणाला? सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीत…

Ashok Chavan उद्या मीच राहिलो नाही तर….

मीच उद्या माझं म्हणणं नाही राहिलो, कोणावर बोलणार राजकीय क्षेत्रात तुम्ही? बोलणार कोणावर? माझं म्हणणं आहे की, मलाही जिवंत ठेवा. मी जिवंत राहिलो, तर तुम्ही पण जिवंत राहाल. मीच संपलो, तर तुम्ही कसे राहणार? तुम्हाला बोलायला काही राहणार नाही”, असे उत्तर अशोक चव्हाणांनी दिले.

Ashok Chavan मला संपवू नका, मी कोणाचं वाईट केलेलं नाही…

मला संपवू नका. जी मंडळी टीका करतात, त्यांना म्हणतोय. २४ तास चालू असतात. एवढं तर वाईट केलं नाही ना कोणाचं? केलंय का? माझं म्हणणं एवढंच आहे की, इथंपर्यंत यायला ४० वर्षे गेली. शेलगावने मला साथ दिलेली आहे, मी नाकारणार नाही, विसरणार नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img