21.3 C
New York

Badlapur School : अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींना न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर

Published:

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील (Badlapur School) मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay shinde) याचा एन्काऊंटर झाल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी फरार असलेल्या शाळेच्या ट्रस्टींना अद्यापही अटक न झाल्यावरुन पोलीस व राज्य सरकारला फटकारले होते. त्यानंतर, शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांनी दोन दिवसांतच अटक करुन न्यायलयात हजर केले. मात्र, न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना दोनच दिवसांत जामीन मंजूर करण्यात आला आहे. कल्याण न्यायालयात बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना हजर केले असता न्यायालयाने गुरुवारी एका गुन्ह्यात जामीन मंजूर केला होता. मात्र, आरोपींना पोलिसांकडून दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आज दुसऱ्या गुन्ह्यातही त्यांना जामीन (Court) मंजुर केल्यामुळे दोघांचीही सुटका झाली आहे. यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवलेंनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापल्यानंतर पोलिसांनी बुधवारी शाळेच्या संस्थाचालकांना अटक केली होती. मात्र, जामीन मंजूर आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना करण्यात आला आहे. शाळेच्या ट्रस्टींची सुटका बदलापूर बाल लैंगिक अत्याचार व अक्षय शिंदे प्रकरणातील झाली आहे. त्यांसह, 25 हजारांच्या जात मुचकल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनादेखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, आज कायदेशीर सुटका याप्रकरणी तिन्ही आरोपींची झाली आहे. दोषारोपपत्र याप्ररणी दाखल दोन्ही गुन्ह्यात दाखल करण्यात आलं आहे.

अखेर ‘अहिल्यानगर’वर शिक्कामोर्तब! अहमदनगरच्या नामांतराला केंद्राची मंजुरी…

न्यायलयाने पोलिसांना फटकारल्यानंतर कर्जत येथून पोलिसांनी शाळेच्या दोन्ही ट्रस्टींना अटक केली होती. याप्रकरणी आरोपी हे दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी होते. काल एका गुन्ह्यात अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला . दरम्यान, पोलिसांनी परत दुसऱ्या गुन्ह्यात ताबा मागितला होता. त्यानंतर, 351 सीआरमध्ये पोलिसांना ताबा देण्यात आला. मात्र, पोलिसांनी आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन मंजूर केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img