16.4 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोघांना 57 लाख रुपयांचा गंडा

पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोन नागरिकांना 57 लाख रुपयांना गंडा घातला आहे. यावेळी शिवाजीनगर आणि वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये बससेवा बंद: कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

नागपूर महानगरपालिकेची आपली बससेवा आज पूर्णपणे ठप्प झाली आहे. कर्मचाऱ्यांनी पगारवाढ न मिळाल्याच्या कारणास्तव बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे दररोज दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रभावित झाले आहेत, ज्यात दैनंदिन कामावर जाणारे आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 2010 पासून पगारवाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे, आणि वाढती महागाई लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील मुंबादेवी-महालक्ष्मी मंदिर शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज

मुंबईतील मुंबादेवी-महालक्ष्मी मंदिर शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरा आणि बॅग स्कॅनिंग मशीनची सोय करण्यात आली आहे. मुंबादेवी मंदिर पहाटे ५.३० वाजता मंगल आरती करुन उघडले. ७ ॲाक्टोबरला सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव होणार आहे.

नाशिकमध्ये आज उद्योगभरारी कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थितीत

राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, उद्योजकांना दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा आणि औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आलीये. उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत भरारी घेत प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा उद्योग विभागाने केला आहे. याचसाठी आज नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील डेमॉक्रसी हॉटेलमध्ये उद्योगभरारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे व प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img