राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पडले होते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा यंदाचा दसरा मेळावा कुठे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दसरा मेळाव्याचे अखेर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठिकाण जाहीर केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले. आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी त्याला..पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
आजची राजकीय पत्रकार परिषद नाही. राज्यात जे अराजक माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. असंच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर आलं होतं. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती. या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं ऑडिओ आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.