16.5 C
New York

Ajit Pawar : बारामतीत शक्ती अभियान महिलांच्या सुरक्षेसाठी राबवणार, अजितदादांची माहिती

Published:

पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर अशी होती, पण आता तेच पुणे कोयता गँग, गोळीबार, हिट अँड रन सारख्या घटनांमुळे देशात चर्चेत येत आहे. पुण्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. (Ajit Pawar) 15 दिवसांपूर्वी बारामतीतून पुण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला होता. यानंतर तीन दिवसांपूर्वीच बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात 12 वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्याची महाविद्यालय परिसरात हत्या करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती पोलिसांसोबत बैठक घेतल्यानंतर आता शक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Ajit Pawar will implement Shakti Abhiyan in Baramati against the background of increasing crime)

अजित पवार यांनी उपविभागीय, एसपी, ऍड, एसपी यांच्यासोबत बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सकाळी 6 वाजता बैठक पार पडली. पत्रकार परिषदेत यानंतर त्यांनी म्हटले की, बारामतीत शक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उपक्रम बारामती पोलीस करणार असून यातून महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन करतील. तसेच या अभियातून शक्ती बॉक्स अशाप्रकारची एक तक्रार पेटी जागोजागी ठेवण्यात येणार आहे.

अनेक महिला आणि मुली मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड किंवा आयडी ब्लॉक करून येणाऱ्या फोन कॉल्सबद्दल आपली तक्रार करायला घाबरतात. ज्या महिला किंवा मुलींना मनमोकळे करून ही गोष्ट सांगता येत नाही त्यांना आपली तक्रार करता यावी यासाठी परिसरातील शाळा, महाविद्याल, सर्व सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, रुग्णालय, एसटी स्टॅण्ड, ट्युशन, महिला वसतीगृह, पोस्ट ऑफीस या सर्व ठिकाणी पोलीसांकडून शक्ती बॉक्स तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. अजित पवार म्हणाले की, आपलं शहर वाढत आहे. जिल्ह्याचं महत्त्वाचं शहर म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर आपला नंबर लागत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे गुन्हेगारी होत असताना शहरातील कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी नागरिकांनी पण बऱ्याचदा सहकार्य करायला हवं.

मविआचं ठरलं! मुंबईचाही तिढा मिटला; वाचा कुणाला किती जागा?

Ajit Pawar एक कॉल प्रॉब्लम सॉल

दरम्यान, काही ठिकाणी हा माझा परिसर किंवा हा आमचा महत्त्वाचा चौक ज्याला मागे विद्या कॉर्नर चौक म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी काही लोकांकडून दहशत दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे सर्वसामान्य लोक तक्रार करायला घाबरतात. अशा लोकांसाठी शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रार पेटी ठेवण्याचा आपण निर्णय घेतला आहे. तसेच एक कॉल प्रॉब्लम सॉल असा स्लोगन असलेला शक्ती हेल्पलाईन नंबर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 9209394917 या क्रमाकांवर नागरिकांना आपल्या तक्रारी 24×7 सेवा सुरू करण्याचा निर्णय घेला आहे. हा क्रमांकवर परिसरातील सर्व ठिकाणी लावण्यात येणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

Ajit Pawar प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शक्ती कक्ष स्थापनार

उपविभागीय कार्यालय आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आहे. तसेच महिला, मुली आणि बालके यांना भयमुक्त वातावरण त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणींचं निराकरण करणे, तसेच समुपदेशन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणे, अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलण्यासाठी तयार करणार आहोत.

Ajit Pawar सोशल मीडियावर असणार शक्तीची नजर

दरम्यान, व्हॉअप स्टेट्स, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडिया यावर अल्पवयीन मुले-मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र, बंदूक, पिस्तुल, चाकू अथवा इतर धारदार शस्त्रासह फोटो टाकतात. अशा फोटोंवर शक्ती नजर काम करणार आहे. यानंतर शक्ती भेटच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय, सर्व सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, रुग्णालय, एसटी स्टॅण्ड, कोचिंग क्लासेस, ट्युशन आणि महिला वसतीगृह याठिकाणी भेटी देऊन तेथील महिला व मुलींना महिला विषयक कायदे, गुड टच बॅड टच, व्यासनाधिनता, बालगुन्हेगारी इत्यादीबाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे. त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लैंगिक, शारिरीक व मानसिक छळापासून संरक्षण करून सदर बाबत जागरुकता निर्माण करणे, तसेच सदर ठिकाणी विशेष पेट्रोलिंग नेमून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img