16.4 C
New York

Sanjay Raut : राऊतांनी सांगितलं महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं असेल?

Published:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका अंतिम टप्प्यात आल्यात आहेत. (Sanjay Raut) मात्र महाविकास आघाडी बुधवारी सलग तिसर्‍या दिवशी बैठक पार पडली. या बैकीत काँग्रेस आणि ठाकरे गट 100 जागांवर अडून बसल्याने ‘मविआ’तील जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीची पुढील बैठक 8 ते 10 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. तसेच घटस्थापनेपूर्वी जागावाटपाचा तिढा सुटेल, असा दावा काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते करत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाचे सूत्र कसे असेल याबाबत माहिती दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut gave information about seat allocation of Mahavikas Aghadi in Assembly elections)

संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करण्यात महाविकास आघाडीला मदत करणाऱ्या सर्व छोट्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहे. ही निवडणूक लढताना कोण कोणत्या जागेवर लढणार हा प्रश्न नाहीय. ज्या पक्षाने जी जागा जिंकलीय, ते त्या जागेवर लढणार आहेत. म्हणजे समजा समाजवादी पक्ष ज्या ठिकाणी जागा जिंकू शकते, तिथे त्यांना जागा देण्यात येईल. हे महाविकास आघाडीचं जिंकण्याचं गणित आहे. कोणी 200 आणि कोणी 100 जागा लढेल अशा आकड्यांवर आम्ही चर्चा करत नाही, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

बारामतीत शक्ती अभियान महिलांच्या सुरक्षेसाठी राबवणार, अजितदादांची माहिती

संजय राऊत म्हणाले की, तिन्ही पक्ष प्रमुख मिळून महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढत आहोत. हे आमचं सूत्र आहे. लोकसभेला तेचं सूत्र होतं आणि आता विधानसभेलाही तेचं सूत्र राहणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर आमची चर्चा झालेली आहे. विधानसभेत जिंकण्याचं आणि लढण्याचं गणित प्रत्येक मतदारसंघ वेगळं असतं. त्यामध्ये अनेक पैलू असतात. उमेदवाराची क्षमता काय? पक्षाची ताकद किती? इतर सामाजिक परिस्थिती कशी? यासंबंधी चर्चा प्रत्येक मतदारसंघासंबंधी होत असल्याने जागावाटपाबाबत वेळ लागत आहे. आम्ही आकड्यावर गेलो असतो तर तासाभरात निर्णय झाला असता. पण आम्हाला भाजपाचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या गद्दारांचा पराभव करायचा आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे. त्यामुळे दसऱ्याच्या आत जागावाटपाबाबत सर्व स्पष्ट होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img