16.5 C
New York

Maharashtra Elections : मविआचं ठरलं! मुंबईचाही तिढा मिटला; वाचा कुणाला किती जागा?

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत (Maharashtra Elections) जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमध्ये बहुतांश उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांत होत आहे. तर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला निश्चित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. या जागावाटपात महाविकास आघाडीतून महत्वाची बातमी समोर आली आहे. मविआत (MVA) बहुतांश जागांचा तिढा सुटला आहे. उद्धव ठाकरे गट राज्यातीस १०० जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी जवळपास २३ मतदारसंघांचा तिढा मिटवण्यात आघाडीला यश मिळालं आहे.

Maharashtra Elections मुंबईतील २३ जागांचा तिढा मिटला

मुंबईतील जागावाटपात ठाकरे गटाचं वर्चस्व दिसून आलं आहे. ठाकरे गटाला १३, काँग्रेसला ८ तर शरद पवार गट आणि समाजवादी पक्षाला एक जागा सोडण्यावर सहमती बनल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त बाकीच्या १३ जागांचा तिढाही लवकरच मिटेल असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात कुणाचा उमेदवार राहिल याचीही चर्चा बैठकीत झाली. ठाकरे गट राज्यातील १०० ते १०५ मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. काँग्रेसलाही शंभरच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ८० जागा मिळतील अशी शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्याखालोखाल ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले होते. तरीही शरद पवार गटाचा स्टाईक रेट चांगला राहिला होता. ठाकरे गटापेक्षा कमी जागा मिळाल्यानंतरही जास्त जागा निवडून आणता आल्या. असे असतानाही विधानसभा निवडणुकीत नवा फॉर्मुला राष्ट्रवादीकडून राबवला जात असल्याचे दिसत आहे. निवडून येण्याची क्षमता आणि उमेदवाराची ताकद या गोष्टींचा विचार करून शरद पवारांकडून जागांची निवड होत असल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img