9.5 C
New York

Rain Alert : राज्यात पावसाचे कमबॅक! आज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार

Published:

मागील आठवडाभरापासून थबकलेला पाऊस पुन्हा (Maharashtra Rain) सुरू झाला आहे. मान्सूनने परतीचा प्रवास वेगाने सुरू केला आहे. सध्या ऑक्टोबर महिन्यात दुपारच्या वेळी कडाक्याचे (Rain Alert) उन जाणवत आहे. तर सायंकाळच्या वेळी तापमानात घट होत आहे. काल बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी (Heavy Rain) लावली. त्यानंतर आज घटस्थापनेच्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) मंगळवारी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सून परतला. त्यानंतर मात्र मॉन्सून परतीची वाटचाल ‘जैसे थे’ आहे. नैऋत्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर, तसंच दक्षिण गुजरात आणि परिसरावर चक्राकार वारं वाहत आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. याआधी रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

एकनाथ शिंदे भाजपसाठी हा मतदारसंघ सोडणार का?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नगर, पुणे, सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस होईल अशी शक्यता आहे. कोकणातील रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांतही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात उर्वरीत ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. दरम्यान, राज्यात आता बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. ऑक्टोबर महिन्यातील उन्हाळा जाणवू लागला आहे. तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिसत आहे. आज देशभरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात प्रारंभ झाला आहे. या घटनास्थापने दिनी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img