15.5 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

10 तारखेनंतर आचारसंहितेची शक्यता, गुरूवारी मंत्रिमंडळाची बैठक

गुरूवारी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 10 तारखेनंतर आचारसंहितेची शक्यता असल्याने, मंत्रिमंडळाने येत्या निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत विकास योजना, सामाजिक कल्याण योजना आणि इतर महत्त्वाचे विषय चर्चेत येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या या निर्णयांमुळे राज्याच्या आगामी धोरणांवर महत्त्वाचा प्रभाव पडू शकतो.

1000 वर्षांनंतरही स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल: पीएम मोदी

आजपासून 1000 वर्षांनंतर जेव्हा 21 व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातील सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू ही दुःखद आणि दुर्दैवी घटना – सुप्रिया सुळे

पुण्यातील बावधन बुद्रुक येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन जण मृत्युमुखी पडले. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,३५६ ग्रॅम गांजा जप्त

मुंबई सीमाशुल्क विभागाने बँकॉकवरून आलेल्या एका प्रवाशाकडून १,३५६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. हा गांजा खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे १ कोटी ३४ लाख रुपये आहे. प्रवाशाने बँकॉकहून मुंबईत येत असताना हा गांजा तस्करीचा प्रयत्न केला होता, मात्र सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सावधानतेने त्याचा पर्दाफाश केला.

अनंत अंबानी मातोश्रीवर, तेजस ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट

अनंत अंबानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटीमागील उद्दिष्ट आणि चर्चा याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही, परंतु राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा आहे.

महाराष्ट्रासह 9 राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान  विभागाचा अंदाज

महाराष्ट्रासह ९ राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, नगर, रायगड, धुळे, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा दुर्घटनेत मृत्यू

बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले असून यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बावधनमधील केके बिल्डरच्या डोंगरावरील ही घटना आहे. पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत फोन आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img