8.6 C
New York

 Pune Helicopter Crash : सुनील तटकरे ‘त्या’ हेलिकॉप्टर मधून प्रवास करणार होते, परंतु…

Published:

पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर  (Pune Helicopter Crash) कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन पुण्यातील उड्डाण घेतल्यानतंर अवघ्या तीन मिनिटातच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. डोंगराळ भागातून जात असल्याने हे हेलिकॉप्टर तिथे मोठ्या प्रमाणावर धुके होते. हे हेलिकॉप्टर या धुक्याचा अंदाज न आल्याने कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे. एक मोठी अपडेट आता याबद्दल समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन आज सकाळी 7.30 वाजता एका हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. यानंतर हे हेलिकॉप्टर मुळशी भागातील डोंगराळ परिसरातून जात होते. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर आहे. हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज याच धुक्यामुळे चुकला आणि हेलिकॉप्टर थेट दरीत कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे. हे हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे होते. केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल या हा अपघात झाला.

पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा दुर्दैवी अंत

पुण्यात अपघात झालेले हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. सुनील तटकरे यांनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. विशेष म्हणजे सुनील तटकरे हे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते आणि त्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. हे हेलिकॉप्टर यानंतर सुनील तटकरे पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले.

यानंतर आज सकाळी हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना नेण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र त्यापूर्वीच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी या हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img