मी 35 वर्ष शरद पवारसाहेबांसोबत राहिलो. या काळात काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून गुरुदक्षिणा दिली. मात्र समरजीत घाटगे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांनी भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडून सगळी कामे करून घेतली. फडणवीस यांनी मला सांगितलं की समरजीत घाटगे हे आठवड्याला 25 ते 30 पत्र बदल्या. निधीची आणत होते. मात्र मला नंतर कळालं की यात किती घोळ झालेला आहे. हे ऐकून मला धक्का बसला अस फडणवीस मला म्हणाले होते. आजपर्यंत त्यांनी इतका फायदा भाजपचा देवेंद्र फडणवीस यांचा घेतला. मात्र गुरुदक्षिणा द्यायच्या वेळी पाठीत खंजीर खुपसून गेले. समरजित घाटगे यांनी दोनदा खंजीर खुपसलं, असं हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटलं आहे.
कागल मतदारसंघातून पाच वेळा मी निवडून आलेलो आहे. परमेश्वराच्या कृपेने 25 वर्ष मला मंत्रिमंडळात देखील काम करण्याची संधी मिळाली. मूलभूत सोयी सुविधायक हा मतदारसंघ मी फार पुढे नेला आहे. कारच्या सगळ्या योजना मी झोपडी पर्यंत आणि चुलीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक योजनांमधील त्रुटी दूर करू शकलो आहे. तालुक्यातील गटातटाचे राजकारण मी संपवलं आहे, असं हसन मुश्रीफांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र ते झारखंड; अजित पवारांसोबत भाजपचं ‘राजकीय प्रँक’
1978 पासून शरद पवार यांचं काम करत आहे. इतक्या वर्षात शरद पवारांच्या आयुष्यात अनेक स्थित्यांतरं आली. या काळात सुख दुःखामध्ये छोटा कार्यकर्ता म्हणून मी साहेबांसोबत राहिलो आहे. आता हा जो निर्णय घेतला आहे. तो देखील साहेबांना भेटून सांगितला होता. आतापर्यंत मी खारीच्या वाट्याप्रमाणे गुरुदक्षिणा शरद पवार यांना दिली आहे. शरद पवार हे माझे दैवत होते, आहेत आणि राहतील. पण माझ्यावर ही परिस्थिती ज्यांनी आणली. त्यांना घेऊन शरद पवारसाहेब फिरत आहेत. यावर मला आक्षेप आहे, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी मनातील सल बोलून दाखवली आहे.