14.6 C
New York

Mumbai News : लाडक्या बहिणीच्या समस्येकडे लाडक्या सरकारचे दुर्लक्ष ?

Published:

मुंबई / रमेश औताडे

लाडकी बहीण लाडका भाऊ किंव्हा अजून कोणी लाडके होऊ पाहत असतील तर ते सर्व मतांच्या जोगव्यासाठी सरकारचे (Mumbai News) राजकारण सुरू आहे आता लपून राहिलेले नाही. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे आहे. नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी सरकारचा व महानगरपालिकेचा मनमानी कारभार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून उघडा पाडला आहे.

नवी मुंबई मधील महानगरपालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था कशी आहे. अधिकारी व डॉक्टर कसे गायब असतात हे प्रत्यक्ष पुरावा देत डॉक्टर व कामगारांची बोलती बंद केली. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयास काळे यांनी अचानक भेट दिली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

यावेळी मोठ्या प्रमाणात दुरवस्था आढळून आली. सर्व औषधे पालिकेने मोफत देणे असा नियम असताना अनेक रुग्णांना औषधे बाहेरून आणायला डॉक्टरांनी सांगितले आहे. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उद्धव खिल्लारे यांना बोलवून काळे यांनी धारेवर धरले. ज्या ब्रँड ची औषधे रुग्णालयाच्या मेडिकल मध्ये नाहीत त्या ब्रँड ची औषधे डॉकटर रुग्णांना लिहून देत असल्याचे आढळले. जी औषधे रुग्णालयात उपलब्ध आहेत, ती औषधे डॉकटर का लिहून देत नाहीत हा प्रश्न मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी विचारला.

रुग्णालयात असणारी एकमेव सोनोग्राफी मशीन बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही रुग्ण खोळंबून होते. त्यांना उपाय म्हणून दुसऱ्या पालिकेच्या रुग्णालयात का पाठवले नाही असाही प्रश्न काळे यांनी उपस्थित केला असता त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते.
एक डॉक्टर जेवणाची वेळ संपून एक तास झाले तरी रुग्णालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णांचे हाल झालेले निदर्शनास आले.रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर १५० ते २०० गरोदर महिला उपचारासाठी वाट बघत होत्या. परंतु फक्त २ स्त्री रोग तज्ञ या महिलांना तपासात असताना बघून नवी मुंबईतील आरोग्य व्यवस्था किती वाईट आहे हे दिसून आले.

गजानन काळे यांच्या सोबत मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई,
विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, निखिल गावडे, अक्षय भोसले, विशाल चव्हाण, विभाग सचिव निलेश सैंदाणे
उप विभाग अध्यक्ष अमोल दहिफळे, शाखा अध्यक्ष प्रणित डोंगरे, गणेश पाटील, जालिंदर पवार, चेतन कराळे व मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक, नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img