15.5 C
New York

Navratri 2024 : नवरात्रोत्सवात मेट्रोकडून जादा फेऱ्याचे नियोजन

Published:

गणेशोत्सवानंतर आता महामुंबई मेट्रोने पश्चिम उपनगरात नवरात्र उत्सवानिमित्त (Navratri 2024) रात्री गरब्याला होणारी गर्दी लक्षात घेता जादा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMMOCL) नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेनच्या वाढीव फेऱ्यांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या मेट्रो फेऱ्यांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. (Mahamumbai Metro will run extra trips till late night in western suburbs during Navratri festival)

नवरात्रोत्सवाच्या काळात मुंबईत 7 ते 10 या वेळेत गरब्यांचे आयोजन करण्यात येते. हजारो लोक गरब्यात सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटतात. तसेच गरबा संपल्यानंतर नागरिक मुंबईतील सार्वजनिक देवींचे दर्शन घेताना दिसतात. त्यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी उशिरा होतो. अशावेळी नागरिकांना सार्वजनिक सेवा उपलब्ध होत नसल्याने प्रायव्हेट गाड्यांनी प्रवास करावा लागतो. त्यामुळे सणाच्यासुदीच्या काळात गर्दी वाढताना दिसते. मात्र आता महामुंबई मेट्रोच्या निर्णयामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी 7 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत दररोज 12 अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येणार आहेत. तसेच दोन मेट्रो फेऱ्यांदरम्यान 15 मिनिटांचा वेळ असणार आहे. यामुळे या उत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना सोयीचे होणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले की, नवरात्रोत्सव लोकांना एकत्र आणतो. त्यामुळे सर्व भाविकांना तसेच नागरिकांना कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतूक प्रदान करणे आमची जबाबदारी आहे. याचपार्श्वभूमीवर आम्ही मेट्रोची सेवा वाढवून नागरिकांना उत्सवादरम्यान रात्री उशीरा होणाऱ्या प्रवासासाठी सोयीस्कर आणि आरामदायक वाहतूक पर्याय प्रदान करीत आहोत, असे डॉ. संजय मुखर्जी म्हटले.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, आमच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रोच्या सेवा वाढवण्याचा निर्णय प्रवासी अनुभव सुधारण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या अतिरिक्त मेट्रोसेवांमुळे उत्सवात सहभागी होणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सुनिश्चित होईल, असेही रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

सुनील तटकरे ‘त्या’ हेलिकॉप्टर मधून प्रवास करणार होते, परंतु…

Navratri 2024 वाढीव फेऱ्यांचे नियोजन कसे असेल

अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली :

23:15 – 00:24
23:30 – 00:39
23:45 – 00:54
24:00 – 01:09
00:15 – 01:24
00:30 – 01:39

गुंदवली ते अंधेरी (पश्चिम) :

23:15 – 00:24
23:30 – 00:39
23:45 – 00:54
24:00 – 01:09
00:15 – 01:24
00:30 – 01:39

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img