14.6 C
New York

Cricket News : क्रिकेटविश्वात खळबळ! एकाच तासांत दोन कर्णधारांचे राजीनामे; नेमकं काय घडलं

Published:

Cricket News : क्रिकेटविश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बांग्लादेशविरोधात विजय मिळाल्यानंतर टीम इंडिया जोशात आहे. आता भारतीय संघाला न्यूझीलंडचं आव्हान पेलायचं आहे. मात्र त्याआधीत क्रिकेट चाहत्यांची निराशा करणारी बातमी आली आहे. अर्थात ही बातमी भारतीय संघाशी निगडीत नाही. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार टीम साऊदीने आपल्या (Tim Southee) कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनेही (Babar Azam) कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, येत्या १६ ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. टीम साऊदीने राजीनामा देण्याचा निर्णय मात्र त्याआधीच घेतला आहे.

या दोन्ही कर्णधारांनी राजीनामा देत जबाबदारीतून मोकळे होऊन वैयक्तिक कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. आता त्यांच्यानंतर संघांसाठी नवीन कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. मागील काही दिवसांत न्यूझीलंड संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या संघाने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाविरूद्धची मालिका गमावली आहे. त्यामुळे संघाचं अपयश पाहता टीम साऊदीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टीम साऊदीने न्यूझीलंडसाठी 2008 मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले असून 382 विकेट्स घेतल्या आहेत. साऊदीने राजीनामा दिल्यानंतर आता न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी टॉम लेथमकडे देण्यात आली आहे. टॉम लेथम न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधीत्व भारताविरुद्ध आता करताना दिसेल.

Cricket News बाबर आझमही पायउतार

पाकिस्तानी क्रिकेट संघाची स्थितीही फारशी चांगली नाही. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे बाबर आझमने पुन्हा एकदा संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वनडे आणि टी 20 क्रिकेटचे कर्णधारपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला दिले होते. त्याला दुसऱ्यांदा ही संधी मिळाली होती. याआधी पाकिस्तान संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर त्याने राजीनामा दिला होता. त्यानंतरही संघाच्या कामगिरीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे पुन्हा बाबर आझमलाच कर्णधार करण्यात आलं होतं. आता मात्र त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img