8.3 C
New York

Sanjay raut : पुन्हा संजय राऊत यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं, म्हणाले

Published:

अमित शहांना स्वप्नदोष झालाय, याला स्वप्न दोष म्हणतात. संपूर्ण भारतीय जनता पक्षालाचा स्वप्नदोषाचा विकार जडला आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहे, त्यांनी संपूर्ण राष्ट्राचा विचार करावा. 2029 तर खूप दूर राहिलं, त्यापूर्वीही तुमचं सरकार राहील की नाही याबाबत विचार करा, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay raut) यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं. 2029 मध्ये भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणेल, असं वक्तव्य अमित शाह यांनी मुंबईत भाजपच्या मेळाव्यात केलं होतं, त्यावरून राऊत यांनी शाह यांना टोला हाणलाय.

विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल आणि 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर केवळ भाजपच्या ताकदीवर स्वबळाची सत्ता येईल, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. त्यावरून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधाताना संजय राऊत यांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवतानाच अमित शाह यांच्या या विधानाचाही समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरण; पोलिसांची मोठी कारवाई

 Sanjay raut स्वप्न पाहणाऱ्यांवर ईडी, सीबीायची रेड टाकू शकत नाही ना !

2024 च्या निवडणुकीत तुम्ही 240 वर थांबलात, 2029 च्या निवडणुकीत भाजपा 140 च्या खाली पोहोचले. या निवडणुकीत तु्म्ही चोऱ्या , माऱ्या, लांडी-लबाड्या करून, थोड्या जागा चोरल्यात. 2029 ला ते शक्य होणार नाही, असं राऊत यांनी सुनावलं. विधासभेला महाराष्ट्रात, जम्मू-काश्मीरमध्ये , हरियाणात तुमचा पराभव होतोय. पण स्वप्न पहायला काय हरकत आहे,? स्वप्न पाहणाऱ्यांवर ईडी, सीबीआय रेड टाकू शकत नाही ना.

भाजपने खुशाल स्वप्न पहावीत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतसुद्धा आमची सत्ता येत्ये, असं ते म्हणू शकतात. त्यांना कुणीही अडवलेल नाही. पण त्यांची सत्ता येण शक्य नाही. या देशातून भारतीय जनता पक्षाचं अध:पतन सुरू झालं आहे, अशा शब्दांत राऊतांनी शाह यांना फटकारलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img