16.1 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार, शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार (ता. ४) आणि शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्याचदिवशी सायंकाळी सहाला कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहुशस्त्राधारी पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी शहरातील ८१ प्रभागांमध्ये आतिषबाजी होणार आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात ४० जागांवर ४१५ उमेदवार नशीब अजमावत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये कोणाचे सरकार स्थापन करायचे हे निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातच ठरणार आहे. या टप्प्यात 39 लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज परळीत

परळी वैजनाथ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज शहरात येणार असून यानिमित्ताने लाडक्या बहिणींच्या वतीने अजित पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींच्या सशक्तिकरणाच्या दृष्टीने, तसेच परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी, नागरिकांशी संवाद साधण्यासाठी अजितदादांसह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुढील 48 तासांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

आजपासून पुढील ४८ तास कोकणातील सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे नगर, पुणे, सातारा, बीड, धाराशिव, लातूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगलीत आज जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवसही या भागात पावसाची शक्यता आहे.

5 ऑक्टोबरपासून दादरवरून सुटणार जलद लोकल, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दादरवरून कर्जत आणि कसारा मार्गावर जलद लोकल सोडण्यात येणार आहे, त्यामुळे या मार्गावरून कर्जत आणि कसाऱ्याकडे प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होईल. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात ५ ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबरपासून २० लोकल सीएसएमटीऐवजी दादरवरून सोडण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img