15.7 C
New York

Sanjay Raut : मोदी आणि शाहांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली; म्हणाले, बाप…

Published:

सध्याचे सरकार हे बैल पुत्र असून, त्यांचा बाप बैल आहे. या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धिही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोक आहेत अशी जिव्हारी लागणारी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राऊतांनी केलेली ही टीका म्हणजे एकप्रकारे मोदी आणि शाह यांची बैलासोबत तुलना केल्यासारखीच आहे. त्यामुळे राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut Attack On Modi, Shah & Maharashtra Government)

Sanjay Raut काय म्हणाले राऊत?

सध्याचे सरकार जे आहे ते बैल पुत्र आहेत, त्यांचा बाप बैल आहे, या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धिही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोक आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दुसरं काही काम नाही, आम्ही गौ मातेला मानतो आम्हाला सांगायची काही गरज नाही. पण गाईला राज्य माता करून तुम्ही गाईचं रक्षण कस करणार असा सवाल राऊतांनी राज्य सरकारला केला आहे.

खरं तर गाईच्या दुधाला भावा द्या, शेतकऱ्यांचा दुधाच्या भावासाठी जो संघर्ष चाललाय त्यावर चर्चा करा, त्यावर बोला, पण ज्यांचा बापाच बैल आहे आणि ज्यांची बुद्धीच बैलाची आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करता असे म्हणत घेण्यात आलेला हा निर्णय निवडणुकीचा एक फंडा आहे. दिल्लीतून काही बैल येत असतात, काही केंद्रातून फिरत असतात, महाराष्ट्राचा त्यांनी बैल बाजार केलेला आहे असेही राऊत म्हणाले.

गाईची पूजा आम्ही सर्व करतो त्यासाठी शासकीय आदेश काढण्याची गरज नाही. तुम्ही सावरकरांना मानता ना, तुमचे जे कोणी हिंदुत्वाचे गब्बर आहेत त्यांनी सावरकरांचं गाई विषयी जे म्हणणं आहे ते आधी एक हिंदू म्हणून समजून घ्या.वीर सावरकर यांनी गौ मातेविषयी जे मत जी भूमिका स्पष्ट केलीये ती जे मान्य असती तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं. सावरकर जर आता असते तर त्यांनी यांच्या कानाखाली लगावली असती असेही राऊत म्हणाले.

परीक्षेतील कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी CBSE बोर्डाचे मोठे पाऊल

Sanjay Raut तोपर्यंत महाराष्ट्रचं देशाची राजधानी

मोदी आणि शहा यांना सारखं सारखं इथे यावं लागतंय याचा अर्थ लोकमत त्यांच्याशी विरुद्ध आहे, त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय म्हणून त्यांच्याशी हातात काहीतरी राहावं यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुदा देशाची राजधानी महाराष्ट्रात भरवतील असं मला वाटत असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut फडणवीसांपासून सर्व नेते कुचकामी

पुण्यातील नव्याने उद्घटन करण्यात आलेल्या मेट्रोवरूनही राऊतांनी डिवचलं. ते म्हणाले की, पुण्यात एकाच मेट्रोच उद्घाटन पंतप्रधान नरेंद् मोदींनी सहा वेळा केलंय असे ते म्हणाले. तसेच अमित शहा गृहमंत्री असून ते वार्डा वार्डात जाऊन बैठका घेत आहेत याचा अर्थ राज्यातला भाजप कुचकामी आहे, देवेंद्र फडणवीसांपासून (Devendra Fadnavis) इतर सर्व नेते कुचकामी असल्याचेही राऊत म्हणाले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथे जी लोकं सत्तेवर बसवली आहेत ते कुचकामी असून, जनता त्यांना फेकून देणार आहे.

Sanjay Raut अमित शाह अन् मोदींची आम्हाली भीती

अमित शहा आणि मोदी महाराष्ट्रात आले कि आम्हाला भीती वाटते, ते जेव्हा जेव्हा राज्यात आले आहेत. तेव्हा तेव्हा एकतर, राज्यातला एखादा उद्योग बाहेर जातो किंवा एखादा भूखंड अदानीच्या घशात जातो. काल दोनशे दहा एकर मिठाघराची जमीन अदानीला देण्याचा निर्णय झाला. त्या जमिनीच मोजमाप करायला तर शाह येत आहेत का, कि व्यवहार पाहायला? असा प्रश्न राऊतांनी करत मोदी-शा इथे आले कि महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होतो असे राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img