15.9 C
New York

Dasara Melava : शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार ‘या’ ठिकाणी

Published:

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) लागले आहे. दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा शिवसेनेत फूट पडण्याआधी पार पडत होता. मात्र शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पडले आहेत. त्यामुळे यंदा कुणाचा दसरा मेळावा गाजणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. बीकेसी मैदानावर यंदा शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरु आहे.

बीकेसी मैदानावर शिंदे गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. यंदाचा शिवसेनेचा तिसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणार आहे. या मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर 40 हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. शिंदे गटाचा पहिला दसरा मेळावा बीकेसीमध्ये झाला होता. त्यानंतर झालेला दुसरा मेळावा हा आझाद मैदानावर घेण्यात आला होता. त्यानंतर आता तिसरा दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून बीकेसी मैदान ठरवण्यात आली आहे. या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था नीट असल्यामुळे बीकेसी मैदान हेच शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी ठरवले आहे.

फडणवीस अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट’, काय आहे प्रकरण?

दसरा मेळावा हा शिवसेना पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. 1966 साली पहिल्यांदा दसरा मेळावा झाल्यानंतर सातत्याने हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आला आहे. बंडाचे राजकारण झाल्यानंतर शिंदे गटामध्ये आणि ठाकरे गटामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद न्यायालयात पोहोचला होता. ठाकरे गटाला न्यायालयीन लढाईनंतर परवानगी देण्यात आली होती. मागच्या वर्षी देखील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवाजी पार्कवर कोणाचा मेळावा होणार यावर राजकारण रंगले होते. त्यानंतर शिंदे गटाने अर्ज मागे घेत आझाद मैदानावर मेळावा घेतला होता. त्यानंतर या वर्षी शिंदे गटाचा तिसरा दसरा मेळावा होणार असून बीकेसीमध्ये शिंदे गटाचा मेळावा होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img