आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठी रणनीती तयार केली आहे. भाजपने 160 जागा लढवण्याचा प्लॅन आखला असून 128 जागा दिल्या जाऊ शकतात.विशेष म्हणजे भाजपने या 160 जागांसाठीही खास प्लॅनिंग केल्याची माहिती आहे. भाजपकडून या 160जागांवर उमेदवारी निवडीसाठी राजस्थान आणि मध्यप्रदेशात वापरलेला फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हा मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न नेमका आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे .
BJP काय आहे राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्न?
एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ज्या160 जागा लढवणार आहे त्या 160 मतदारसंघात 160 पक्षनिरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत हे सर्व पक्ष निरीक्षक त्यांना देण्यात आलेल्या मतदारसंघात पोहचतील आणि मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेतील. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून नावे मागवली जातील. हे पक्षनिरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या मतदारसंघात किती जण निवडणूक लढवण्यासाठी सक्षम आहे, याची चाचपणी केली जाईल. या संभाव्य उमेदवारांची नावे आणि इच्छुकांची नावे आणि त्यांची माहिती एका लिफाफ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात येईल. 160 मतदारसंघातून आलेल्या लिफाफ्यांच्या आधारे संबंधित मतदारसंघातील उमेदवार ठरवला जाईल.
विधानसभेच्या तोंडावर छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आनंदवार्ता…!
BJP अशी असेल प्रक्रिया?
भाजपकडून 160 मतदारसंघांमध्ये 160पक्षनिरीक्षक नेमले जातील. हे पक्ष निरीक्षक विधानसभा मतदारसंघातील 100 पदाधिकाऱ्यांकडे हे लिफाफे देतील आणि या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना त्यांच्या मतदारसंघात कोणता उमेदवार हवा, याबाबतची माहिती त्या लिफाफ्यात टाकण्यास सांगतील. यात प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रदेश पदाधिकारी, विशेष निमंत्रित यांच्यासह , जिल्ह्याच्या विविध मार्च्यांचे अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी, खासदार, आमदार यांसारख्या विविध नेत्यांकडून निवडणुकीस पात्र उमेदवारांची नावे घेतली जातील.
त्यानंतर हे लिफाफे परत आल्यानंतर ते चार पदाधिकाऱ्यांसमोर सीलबंद करून मुंबईतील भाजप कार्यालयात जमा केले जातील. भूपेंद्र यादव आणि चंद्रशेखर बावनकुळे हे लिफाफे उघडतील आणि त्यातील माहिती घेतील. मतदारसंघातील उमेदवाराचे नाव या लिफाफ्याच्या माध्यमातून संबंधित निश्चित केले जाईल, असे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम कऱणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी भाजपने ही योजना केली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत या मास्टरप्लॅनचा फायदा झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही आता तीच पद्धत वापरली जाणार आहे.