-1.7 C
New York

Bigg Boss Marathi : घरात आज येणार स्पेशल गेस्ट ! होणार ग्रँड सेलिब्रेशन

Published:

‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले (Grand Finale) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. (Bigg Boss Marathi) या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. (Bigg Boss Marathi) ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग सदस्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खूपच खास असणार आहे. आज घरात स्पेशल गेस्ट (Special Guest) म्हणून ‘आपला माणूस’ शिव ठाकरे (Shiv Thackeray) येणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”सदस्यांच्या आजवरच्या प्रवासाचे हटके सेलिब्रेशन होणार शिव ठाकरेसोबत”. शिव ठाकरेने आपल्या एन्ट्रीने घरात एक वेगळाच उत्साह आणला आहे. बिग बॉस मराठीच्या एका पर्वाचा शिव ठाकरे विजेता होता. आता शेवटच्या आठवड्यात तो सदस्यांना काय टिप्स देतो हे पाहावे लागेल.

प्रोमोमध्ये शिव म्हणतोय,”अतिशय भव्य-दिव्य हे सेलिब्रेशन असेल. बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं ग्रँड सेलिब्रेशन होईल. तुम्हा सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि सॅल्यूट!”. आता शिव काय हटके सेलिब्रेशन करणार हे पाहावे लागेल.

‘इमर्जन्सी’तील कटवर कात्री चालवल्यास मिळू शकतं प्रमाणपत्र

Bigg Boss Marathi तिकीट टू फिनालेसाठी देणार नवा टास्क

आज या घरातील सदस्यांना खास बाबागाडीतून फिरण्याचा टास्क बिग बॉस कडून दिला गेला आहे. प्रोमोमध्ये, बिग बॉस म्हणत आहेत,”या कारमधून प्रवास करत तुम्ही पोहोचाल ‘बिग बॉस’ च्या अंतिम फेरीत!” या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ च्या घरामधील सदस्य संपूर्ण घरात बाबागाडी फिरवताना दिसत आहे. बाबागाडी फिरवताना ‘बिग बॉस’ चे झेंडे गोळा करत वेळेकडे सुद्धा लक्ष देत आहेत. या टास्कमध्ये कोण जिंकणार? बाबागाडी फिरवत अंतिम फेरीत कोण वेळेत पोहोचणार? हे बघणे अतिशय उत्सुकतेचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img