15.7 C
New York

BJP : भाजपला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का; बडा नेता देणार सोडचिठ्ठी

Published:

भाजपला (BJP) आणखी एक मोठा फटका महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे मुस्लिम नेते हाजी अराफत शेख भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. मुस्लिमविरोधी वक्तव्यामुळे हाजी अराफत शेख राज्यातील भाजप नेत्यांच्या यांच्यामध्ये संतापाची भावना आहे, त्यामुळे ते आपला वेगळा मार्ग निवडू शकतात, असेही बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिम विरोधी वक्तव्यामुळे हाजी अराफत शेख यांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यानंतरही शेख यांनी भेट घेऊन देवेंद्र फडणवीसांनाया संदर्भात माहिती देत, भाजप नेत्यांनी मुस्लिम विरोधी वक्तवे न करण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही भाजप नेत्यांकडून मुस्लिमविरोधी वक्तव्ये होत असल्याने अखेर शेख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय़ घेतला आहे.

अजित पवारांचा महाविकास आघाडीवर निशाणा, म्हणाले

मिळालेल्या माहितीनुसार हाजी अरफत शेख आज (1 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला निर्णय जाहिर करतील आणि पक्ष सोडण्याची घोषणाही करू शकतात, असे सांगितले जात आहे.दरम्यान, हाजी अराफत शेख हे सध्या धानीपूर येथील मशीद बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत. हाजी अराफत शेख हे अयोध्येत राम मंदिराच्या बदल्यात धनीपूरमध्ये मस्जिद बांधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष देखील आहेत. हाजी अराफात शेख यांना मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला विकास समितीचे अध्यक्ष आणि निधी उभारण्यासाठी इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सदस्य बनवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img