15.7 C
New York

Moon Temperature : चांदोमामाबद्दल भारतीय वैज्ञानिकांच्या अभ्यासात मोठा खुलासा

Published:

कोरोना संकटाच्या काळात जगभरात लॉकडाऊन (Corona Lockdown) लावण्यात आले होते.  (Moon Temperature) कोरोना व्हायरसला (Corona Virus) रोखण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून याकडे पाहिले गेले. आता या लॉकडाऊनबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लॉकडाऊनचा परिणाम जगभरातच नाही तर चंद्रावरही (Covid Lockdown Effect on Moon) पडल्याची नवी माहिती समोर आली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात आता तुम्ही म्हणाल चंद्राचा काय संबंध तरयाचं उत्तर मिळालं आहे.

चार वर्षांपूर्वी अख्खं जगच कोरोना संकटाच्या काळात(Covid 19) लॉकडाऊन झालं होतं. या काळात लोकांना घराबाहेरही पडता येत नव्हतं. याच काळात प्रकृती मात्र स्वतः ला रिसेट करत होती. प्रदूषण कमी झालं. हवा स्वच्छ झाली. ज्यावेळी अख्खी पृथ्वीचं कोरोनाच्या विळख्यात अडकली त्याच वेळी पृथ्वीचा उपग्रह चंद्र सुद्धा थंड पडला होता. एप्रिल-मे 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात भारतीय वैज्ञानिकांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की चंद्रावरील तापमानात (Temperature on Moon) मोठी घट झाली होती.

Royal Astronomical Society : Letters च्या मासिक अभ्यासात प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यात अतिशय घनिष्ट संबंध आहे. नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) डेटाची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या रिसर्चर्सने मदत घेतली. त्यांनी 2017 ते 2023 दरम्यान चंद्रावरील सहा वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत नेमके काय बदल होतात याचा अभ्यास केला. त्यांच्या असं लक्षात आलं की लॉकडाऊनच्या दरम्यानच्या तापमानात बाकी वर्षांतील त्याच काळातील (एप्रिल – मे) तापमानाच्या तुलनेत 8 ते 10 केल्विन इतकी घट झाली होती.

कांद्याचे दर वधारले, किलो मागे सरकारला असा होतोय नफा

 Moon Temperature पृथ्वीवर लॉकडाऊन पण चंद्र का गारठला?

कोरोना लॉकडाऊनच्या काळात पृथ्वीवर सगळं काही ठप्प झालं होतं. कंपन्या, कारखाने पूर्ण बंद होते. रस्त्यावर वाहतूकही दिसत नव्हती. प्रदूषण अतिशय (Air Pollution) कमी त्यामुळे या काळात झालं होतं. अब्जावधी माणसे घरात कैद झाली होती. त्यामुळे ग्रीन हाऊस वायूंच्या उत्सर्जनात कमालीची घट नोंदवण्यात आली. पृथ्वीच्या वायुमंडळात याचा परिणाम म्हणून कमी उष्मा राहिला आणि नंतर उत्सर्जित झाला. पृथ्वीच्या रेडिएशनमध्ये घट PRL चे अभ्यासक मानतात की लॉकडाऊनमुळे झाली. यामुळे चंद्रावरील तापमानात घट होऊ लागली. चंद्र एक प्रकारे पृथ्वीच्या रेडिएशन सिग्नेचरच्या ऍम्प्लिफायर प्रमाणे काम करतो.

 Moon Temperature लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा वाढला पारा

अभ्यासकांनी तर 12 वर्षांच्या डेटाचा अभ्यास केला परंतु अहवालात सात वर्षांच्या (2017-2023) माहितीचा वापर केला. म्हणजे लॉकडाऊनच्या तीन वर्षे आधी आणि तीन वर्षांनंतरच्या तापमानाच्या माहितीचा समावेश करण्यात आला. 2020 मध्ये साईट 2 वर सर्वात कमी तापमान 96.2 K इतके होते. तर 2022 मध्ये साईट 1 वर सर्वात कमी 143.8 K तापमानाची नोंद करण्यात आली होती. 2020 मध्ये बहुतांश ठिकाणी साधारणपणे तापमान कमीच राहिले. नंतर पृथ्वीवर लॉकडाऊन जसजसे हटत गेले तसतसे चंद्रावर उष्णता वाढत गेली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img