16 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

विलास लांडे चार नगरसेवकांसह पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

विलास लांडे चार नगरसेवकांसह पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. मागील आठवड्यात देखील शरद पवारांची विलास लांडे यांनी भेट घेतली होती. यापूर्वी अजित पवारांसोबत देखील विलास लांडे यांनी भेट घेत केली होती चर्चा, आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीसाठी विलास लांडे पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

कोणते नगरसेवक शरद पवारांच्या भेटीला?

प्रशांत शितोळे

मयूर कलाटे

मोरेश्वर भोंडवे

विनोद नदे

 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार कमलेश सिंह भाजपमधे प्रवेश करणार आहेत. 3 ऑक्टोबरला सिंह यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून कमलेश सिंह हे हुसेनाबाद मतदार संघाचे आमदार आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष आहेत. कमलेश सिंह यांच्यासोबत त्यांचे पुत्र सूर्या सिंह हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

देशी गायी ‘राज्यमाता – गोमाता’ म्हणून घोषित… राज्य सरकारची घोषणा  

वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायीच्या दुधाची मानवी उपयुक्तता,आयुर्वेदिक चिकित्सा पद्धति, पंचगव्य उपचार, शेण गोमूत्र यांच्या सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचे स्थान यामुळे देशी गायीबाबत निर्णय घेत राज्य सरकारने राज्यमाता गोमाता म्हणून जाहीर केले आहे.

अमरावतीमध्ये भाजप आमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

अमरावतीच्या अचलपूर पोलीस ठाण्यात भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 196 आणि कलम 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान खान अस्लम खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राणेंवर गुन्हा दाखल केला, अशी माहिती विशाल आनंद, एसपी अमरावती यांनी दिली आहे.

आदिवासी समाजातील आमदारांचे धनगर आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलन

धनगर आरक्षणाच्या विरोधात आदिवासी समाजातील १० आमदारांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. नरहरी झिरवळांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन आज मुंबईत मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ होत आहे. या आंदोलनात उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये हेमंत सावरा, काशिराम पावरा, किरण लहामटे यांसारख्या आदिवासी समाजातील प्रमुख आमदारांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, आदिवासी मंत्री विजयकुमार गावित देखील उपस्थित आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img