16 C
New York

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा भाजपाला खोचक टोला,म्हणाल्या

Published:

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुतारी चिन्ह घेऊन आम्ही लढावे, अशी अनेकांची इच्छा आहे. (Supriya Sule) शरद पवारांना आमच्या इंदापूरचे सर्व नेते आणि पदाधिकारी म्हणून रविवारी येऊन भेटले आहेत. त्याचवेळी माझी सुद्धा पदाधिकाऱ्यांसोबत भेट झाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने चालणार पक्ष आहे, असा संवाद त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी बोलताना म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील आणि आमचे कौटुंबिक संबंध दहा दशकाचे आहेत. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत ते संबंध प्रेमाने आदराने पाळले जातील. तसेच कोण काय राजकीय निर्णय घेईल तो वेगळा विषय आहे. त्याचा आमच्या कौटुंबिक संबंधावर काहीही परिणाम होणार नाही. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाला खोचक टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये हसना मना है, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. कोणी मस्करीत जरी काही बोललं तरी ते फार मनाला लावून घेतात. (Supriya Sule’s taunt to BJP.)

काही नेते पक्षातून उमेदवारी न मिळाल्यास सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दुसऱ्या पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीत दिसत आहेत. अशी परिस्थिती अशातच इंदापुर मतदारसंघात देखील निर्माण झालेली आहे. या मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास शरद पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अशातच या मुद्द्यांवरून इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून काल (रविवारी) त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. सध्या इंदापुरात हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेतली.

गुहागर विधानसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याला उमेदवारीची शक्यता

मविआमध्ये शरद पवार गटाला इंदापूरची जागा सुटण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपकडून संधी न मिळाल्यास हर्षवर्धन पाटील यांच्याकडे तुतारी हाती घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील तसा आग्रह आहे. पण शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा यासाठी विरोध आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी रविवारी शरद पवारांची भेट घेतली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img