प्रत्येक विषयावर आपली स्पष्ट भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मांडताना अनेकदा आपण पाहिले आहे. (Sanjay Raut) त्यांनी नुकतेच सध्या राज्यात चर्चेत असणाऱ्या लाकडी बहीण योजनेवर आपले मत मांडला. नागपूरमध्ये आयोजित उद्योगांसंदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुंतवणुकदारांना सल्ला दिला की, गुंतवणुकदारांनी सरकारच्या भरोश्यावर राहू नये. अनुदानाच्या पैशांची शाश्वती लाडकी बहीण योजनेला पैसे द्यावे लागतात, त्यामुळे नाही. नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, उद्याच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना ही शिंदे गटाकडून मतं विकत घेण्याची योजना आहे. लाडक्या बहिणींवर फार प्रेम उफाळून आलं आहे, म्हणून ही योजना आलेली नाही. लाडक्या बहीण योजनेकडे राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर प्रमुख योजनांचे आणि प्रकल्पाचे पैसे या एका वळवले आहेत. तसेच लाडक्या बहीण योजनेवरूनसुद्धा सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना पैसे मिळत आहेत, त्या सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन त्यांना व्यक्तिगत पत्र पाठवले आहे. त्यातून मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे.
सुप्रिया सुळेंचा भाजपाला खोचक टोला,म्हणाल्या
नितीन गडकरी म्हणतात ते बरोबर आहे. जर अशाप्रकारे तिजोरीत पैसे नसताना पैशाचा अपहार व अपव्यय सुरू असेल आणि इतर योजना बंद केल्या जात असताना केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय, गृहमंत्रालय, प्रधानमंत्री कार्यालयाकडे देशाचं आर्थिक नियोजन करण्याचे अधिकार आणि कर्तव्य आहे. त्यामुळे कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच देश पुढे जाईल. अशावेळेला केंद्र सरकार, वित्त मंत्री आणि प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही? नितीन गडकरी ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. त्यामुळे मला वाटतं की, त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये याविषयी प्रस्ताव मांडायला हवा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut काय म्हणाले होते नितीन गडकरी?
दरम्यान, नागपूरमध्ये आयोजित उद्योगांसंदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, माझं तर म्हणणं आहे की कोणत्याही पक्षाचं सरकार असूद्या. गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवलं पाहिजे. कारण सरकार हे विषकन्या असते. ज्यांच्या बरोबर जाते त्यांना बुडवते. त्यामुळे तुम्ही त्यांच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे तर घ्या. मात्र, अनुदान कधी मिळेल आणि कधी नाही याचा काहीही भरोसा नसतो. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, मला एकाने सांगितलं की साडेचारशे कोटी अनुदान आले आहे. टॅक्सचे पैसेही जमा आहेत. मग ते पैसे कधी मिळतील? मी त्यांना म्हटलं परमेश्वराला प्रार्थना करा. कारण काही भरोसा नाही. यावर त्याने म्हटले की, पैसे मिळणार का? मी त्याला म्हटले की, जेव्हा येतील तेव्हा मिळू शकतात. यावर त्याने पुन्हा विचारले की, अनुदानाचे पैसे मिळतील का? मी त्याला म्हटले की, याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो, असे सूचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले. यानंतर आता विरोधक महायुती सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत.