बॉलिवूड (Bollywood) स्टार मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (Dadasaheb Phalke Award 2024) भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. 8 ऑक्टोबर रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मिथुन दा यांचा उल्लेखनीय चित्रपट प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो!”
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे. ‘मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, दादासाहेब फाळके निवड ज्युरीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.’ सध्या वैष्णव यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.8 ऑक्टोबर रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन दा यांना प्रदान करण्यात येणार आहे. असं देखील अश्विनी वैष्णव यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यांच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत मिथुन चक्रवर्ती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
मुंबईतील 5 जागांसाठी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा आग्रह
मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदी, तमिळ आणि बंगालीसह 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1976 मध्ये आलेल्या ‘मृगया’ चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 1982 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. 100 कोटींचा व्यवसाय करणारा हा त्याचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाने मिथुन सुपरस्टार झाला.