16.5 C
New York

Ajit Pawar : अजित पवारांचा आमदार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसतशा राजकीय वर्तुळातही हालचालींना वेग आला आहे. (Ajit Pawar) अशातच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. रविवारी (29 सप्टेंबर ) सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे शरद पवार यांची सभा पार पडली.त्यानंतर आजच बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांत बबनदादा शिंदे यांनी तिसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेतल्याने ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार, असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. आद शरद पवार पुण्यात आहेत. पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या शरद पवारांच्या निवास्थानी नेते आणि कार्यकर्त्याची भेटीसाठी गर्दी झाली आहे. यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.

Ajit Pawar दोन बडे नेते शरद पवारांच्या भेटीला

शरद पवारांना भेटण्यासाठी अजित पवारांचे दोन मोठे नेते आले आहेत. सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील सरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

मुंबईतील 5 जागांसाठी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा आग्रह

Ajit Pawar सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आमचे सगळ्यांशी प्रेमाचे संबध आहेत. मोहिते पाटील, बबन शिंदे, पवार साहेब यांचे जुन संबध आहेत. बबन शिंदे यांचे पवार साहेबांसोबत खुप जुने संबध आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या

भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत आहे. भोसरीत सहकार्य करावे रवी लांडगे आज शरद पवारांना विनंती करणार आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img