16 C
New York

Ajit Pawar : अजित पवारांचा एक फोन अन् उमेदवाराच्या नावाची घोषणा

Published:

साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना उपस्थित राहता आले नाहीत. अजित पवार यांनी साताऱ्यामधील फलटण विधानसभा मतदार संघातील उमदेवार जाहीर केला आहे.

Ajit Pawar फोनवरुन जनतेशी साधला संवाद

फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहणार होते. परंतु त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. मात्र त्यांनी सभेत फोनवरुन नागरिकांसोबत संवाद साधला. त्यावेळी आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली. विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना अजित पवार यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Ajit Pawar भाषणा दरम्यान उमदेवारीची फोनवरुन घोषणा

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारीला मदत करणारे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषण सुरु होते. त्यावेळी अजित पवार यांनी फोनद्वारे दीपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरील गडकरींचं विधान चर्चेत

Ajit Pawar काय म्हणाले अजित पवार

अजित पवार यांनी फोनवरुन बोलताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमचे गाव फलटण विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदार संघात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण हे उमेदवार आहेत. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि सहकार्य करावे. त्यांना संधी दिल्यानंतर तुमच्या मतदार संघ अन् जिल्ह्यासाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी देईन. माझ्यावर विश्वास ठेवावा. मायमाऊलींना भाऊबीजेची ओवाळणी दिल्याशिवाय तुमचा भाऊ गप्प बसणार नाही.

साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष वाढलेला आहे. तो लोकसभा निवडणुकीत दिसून आला. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार असताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. निंबाळकर कुटुंबाने उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. सोमवारी अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर हास्य आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img