16.2 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छता मोहिम

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पासून स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली आहे. येत्या 3 आक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज पुण्यात तर शरद पवार गटाचे समरजीत घाडगे मुंबईत घेणार मेळावे

राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज पुण्यात तर शरद पवार गटाचे समरजीत घाडगे मुंबईत मेळावे घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध शहरातील आपल्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे सुरू आहेत. समरजीत घाडगे आज डिलाईल रोड येथे दुपारी ३ वाजता ग्रामस्थांशी संवाद साधणार, मागील रविवारी यांच ठिकाणी हसन मुश्रीफांनी मेळावा घेतला होता.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून प्रवाशांसाठी सुरू होणार जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग

आजपासून प्रवाशांसाठी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण होणार आहे. संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे ४ मेट्रो स्थानके आहेत.

 मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची पाठराखण

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पाठराखण केली आहे. कोल्हापूर खंडपीठ ही काळाची गरज आहे. राज्याच्या टोकाला राहणाऱ्या रहिवाशांना जलद आणि प्रभावी न्याय मिळवा, असं न्यायमूर्ती गवई म्हणाले. न्यायमूर्ती गवई २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनण्याच्या मार्गावर आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img