16.1 C
New York

Nepal Flood : नेपाळमध्ये वादळी पाऊस! आत्तापर्यंत 112 जणांचा मृत्यू

Published:

नेपाळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. ११२ जणांचा (Nepal Flood) भूस्खलन आणि पुरामध्ये सुमारे मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये गुरुवारपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांत जोरदार पाऊस होत आहे.

Nepal Flood विजेचा पुरवठा खंडित

नेपाळला पुराचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप 79 जण बेपत्ता आहेत. काटमांडू खोऱ्यातील १६ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत ३००० लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. अनेक शहरांमध्ये पाणी साचलं आहे. ६३ ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग सध्या देशातील ब्लॉक झाले आहेत. अनेक भागात विजेचा पुरवठा नेपाळमध्ये खंडित झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काटमांडूमधील २२६ गावे पाण्याखाली गेले आहेत.

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पाहा आज कुठे बरसणार

कार्यकारी पंतप्रधान आणि नागरी विकास मंत्री प्रकाश मान सिंह यांनी मंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेतली. युद्ध पातळीवर हालचाली करण्याचे आदेश यावेळी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Nepal Flood पावसाचा बिहारला धोका

गंडक, कोसी आणि बागमती नदीपात्रात नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुरस्थिती आहे. याचा फटका बिहारमधील १३ जिल्ह्यांना बसला असून यामुळे १,४१,००० लोक प्रभावित झाले आहेत. पश्चिम चंपारन, पूर्व चंपारन, शिवहर, गोपालगंज, शिवन, सितामर्ही, अरारिया, क्रिष्णकुंज, पुर्णिया, सुपौल, मधेपुरा, मुजफ्फरपुर आणि मधुबनी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. प्रशासनाने मदतकार्य सुरु केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img