16.1 C
New York

Jawhar : विक्रमगड विधानसभा शिवसेनेने लढावी, कार्यकर्त्यांची मागणी

Published:

संदीप साळवे, जव्हार

जव्हार:- (Jawhar) आगामी काळात होऊ घातलेल्या, विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेसाठी महायुतीतून जव्हारला नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी जव्हार तालुक्यातील शिव सैनिकांनी केली आहे.दरम्यान, तालुक्यातील खंबीर व जबाबदार नेतृत्व तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तिय विनायक राऊत यांना प्रथम पसंती देवून त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घातली जावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

गेल्या काही वर्षांपासून जव्हार तालुक्यातील आमदार झाला नसल्याने विधानसभेचे प्रतिनिधित्व जव्हारला करता आले नाही, त्यामुळे तोंडावर आलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार मिळाल्यास शिवसैनिक जोमाने त्या उमेदवाराचा प्रचार करून निवडून आणतील आशी आशा जव्हारचे शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

मोठी बातमी! महाराष्ट्र सरकार आर्थिक डबघाईला

जव्हार तालुका शिवसेना विक्रमगड विधानसभेसाठी आग्रही असून येणाऱ्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेचा उमेदवार हा शिवसेनेचाच असावा अशी मागणी शिवसैनिकांकडून जोर धरत आहे.दरम्यान, जव्हार तालुका शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राऊत अथवा त्यांचे चिरंजीव कल्पेश विनायक राऊत यांच्या नावाच्या उमेदवारीची विक्रमगड मतदार संघात जोरदार चर्चा सुरू असून त्यांना उमेदवारी मिळाल्यास ते निवडून येऊन पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेत विक्रमगड मतदार संघाच्या वतीने स्थानिक जव्हारचा आमदार पाहायला मिळेल अशी आशा जव्हार तालुका शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.

विक्रमगड विधानसभा जर शिवसेनेला सोडण्यात आली तर तालुक्यातील शिवसैनिक जोमाने प्रचार करून जव्हारच्या आमदाराला प्रथमच विधानसभेत पाठवतील. व येथील विकासाला चालना मिळेल.-विनायक राऊत, शिवसेना तालुकाप्रमुख,जव्हार.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img