16.1 C
New York

Akshay Shinde : अक्षय शिंदे याच्या मृतदेहास उल्हासनगरमध्ये दफन करण्यास विरोध

Published:

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. मात्र अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी जमीन देण्यास प्रत्येक ठिकाणी स्थानिकांकडून विरोध होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत जागा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. याचपार्श्वभूमीवर आज, रविवारी (29 सप्टेंबर) उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी खड्डा खणण्यात आला. मात्र स्थानिकांकडून या ठिकाणीही विरोध होताना दिसत आहे. (Protest in Ulhasnagar to bury Akshay Shinde body)

न्यायालयाच्या निर्देशानंतर गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाने दिलेली मुदत उद्या, म्हणजेच सोमवारी (29 सप्टेंबर) संपत असल्याने आज उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाकडून खड्डाही खोदण्यात आला. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरमध्ये पुरण्यासाठी विरोध दर्शवण्यात आला.

मोठी बातमी! महाराष्ट्र सरकार आर्थिक डबघाईला

उल्हासनगरमधील शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी म्हणाले की, पोलिसांनी खड्डा करण्यास सांगितले असले तरी आमचा त्या नराधमाला या ठिकाणी पुरण्यास विरोध आहे. त्यामुळे पोलिसांनाही विरोध करण्याची आमची भूमिका आहे. नराधम बदलापुरात तो राहायचा, त्यामुळे त्याचा मृतदेह तिथे नेऊन दफन करावा. उल्हासनगरच्या मातीत या नराधमाचा मृतदेह दफन करण्यास आमचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र चौधरी यांनी दिली. दरम्यान, शिंदें गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी खणलेला खड्डा बुजवला. यावेळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला. स्थानिकांचा विरोध पाहता, उल्हानगर पोलीस आणि एसटी स्मशानभूमीत हजर झाले आहेत.

Akshay Shinde अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यास प्रत्येक ठिकाणी विरोध

दरम्यान, अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. बदलापुरचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी त्या ठिकाणी अक्षय शिंदे याच्यावर अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर, अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली. मात्र, अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेनेने अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला. याबाबत स्मशानभूमी बाहेर शिवसेनेने बॅनर सुद्धा लावले होते. यानंतर बदलापूर नगरपालिकेने पोलिसांना काही जागा सुचवल्या आहेत, मात्र अजूनही जागेची निश्चिती मात्र झालेली नाही. अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी आता फक्त एक दिवस बाकी असल्याने राज्य सरकारला कोणत्याही परिस्थितीत कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार? हे पाहावे लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img