6.3 C
New York

Praniti Shinde : महिला मुख्यमंत्री होणार?, प्रणिती शिंदे म्हणाल्या…

Published:

काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी 2024 ला लोकसभेची निवडणूक लढवली. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव करत प्रणिती यांनी ही निवडणूक जिंकली. सध्या त्या सोलापूरच्या खासदार आहेत. प्रणिती शिंदे लोकसभेवर गेल्याने सोलापूर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला. आता काहीच दिवसात विधानसभेची निवडणूक होणार आहे. अशाच या मतदारसंघात कोण उमेदवार असेल. याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात होत आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रणिती शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.

Praniti Shinde प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?


रिक्त झालेल्या सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे स्पष्ट भाष्य केलं आहे. सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता लढणार आहे. महाविकास आघाडीचे चर्चा वाटप होईलच. पण मी माझं मात मांडलं आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Praniti Shinde महिला मुख्यमंत्री होणार?, म्हणाल्या…

रणजीतसिंह मोहिते पाटील खरंच काँग्रेसच्या वाटेवर?


महाराष्ट्राला अद्यापपर्यंत महिला मुख्यमंत्री लाभलेल्या नाहीत. यावेळी महिला मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आपल्या देशातील कोणत्याही राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्यास त्याचा आंनद आणि अभिमान आहे. महिलांना संधी मिळावी म्हणून काँग्रेसने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. मुख्यमंत्री कोण असणार हे आम्ही नंतर पाहू मात्र आम्ही राज्याला स्थिर सरकार देणार आहोत, असं प्रणिती म्हणाल्या.

देश तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देश एकसंध आहे. आपला देश सेक्युलर आहे. देशात किती हे ध्रुविकरण दमले पेटवण्याचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही. आमच्या महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे आम्ही एकत्र येत सॉलिड सरकार देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं प्रणिती शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं. विमानतळाचं उद्घाटन रद्द झाल्यानंतर हे आमदार कसली पाहणी करत आहेत. आधी एक आमदार पाहणी करतात. नंतर दोन आमदार जातात म्हणजे नक्की काय करत आहेत. भाजपचे दोन आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी विमानतळाची पाहणी केली, असंही त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img