19 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

 इस्त्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर ठार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्ला संघटनेला नष्ट केल्यानंतरच आपण मरेन, अशी शपथ यूएनमध्ये व्यक्त केली होती. दरम्यान, इस्रायलकडून हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ले सुरूच आहेत. दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि त्याचा नायब हुसेन अहमद इस्माइल इस्त्रायली हवाई हल्ल्यात ठार झाला आहे.

केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क

मुंबईत हाई अलर्ट आहे. केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. धार्मिक स्थळे गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. दहशतवादी मुंबईला लक्ष्य करणार असल्याचं केंद्रिय तपास यंत्रणांच्या इनपुट नंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे.

तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरण; सुप्रीम कोर्टात सोमवारी होणार सुनावणी

तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सुब्रमण्यम स्वामी आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या . लाडू प्रसादामधे प्राण्यांच्या चरबीच्या भेसळीच्या आरोपाचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली SIT स्थापन करावी अशी याचिकेत मागणी करण्यात आलीय.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्सप्रेसचा शुभारंभ, 800 लाभार्थी अयोध्येला

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्सप्रेसचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थी अयोध्येला रवाना झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची बांधणी करणार

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची बांधणी करणार. ओबीसीतील प्रत्येक घटकापर्यत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न.

 अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात अभाविपा आक्रमक

पुण्यातील कॉलेज मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात अभाविपा आक्रमक झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img