येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. लोकसभेनंतर पुन्हा एकदा महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे तसेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा देखील सुरु झाली आहे. एक मोठी बातमी यातच आता समोर आली आहे. माहितीनुसार, सत्ताधारी महायुतीमध्ये जवळपास 225 जागांवर एकमत झाले आहे.
तर उरलेल्या जागांसाठी आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत माहितीनुसार, महायुती जागावाटपाबात निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाच्या वाटेला कोणता मतदारसंघ येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा मुहूर्त ठरला; जयंत पाटलांनी डेडलाईन सांगितली
तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील पुढील काही दिवसात जागावाटपाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँगेस( शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. महाविकास आघाडीने भाजपसह (BJP) महायुतीला धक्का देत लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागांवर विजय मिळवला होता तर अवघ्या 19 जागांवर महायुतीला विजय मिळवता आला होता. उमेदवारांना प्रचारासाठी विधानसभा निवडणुकीत जास्त वेळ मिळवा यासाठी लवकरात लवकर जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी महायुतीच्या आमदारांनी काही दिवसापूर्वी केली होती. या मागणीचा विचार करून लवकरात लवकर जागावाटपाबाबात निर्णय घेण्यात यावा अशी भूमिका महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे.
महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासुन मतभेद होत असल्याने राजकीय वर्तुळात अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा जोराने सुरु आहे मात्र आता 225 जागांवर महायुतीमध्ये जवळपास एकमत झाले असल्याची माहिती समोर येत असल्यानेअजित पवार महायुती सोडणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.