19 C
New York

 Hezbollah : इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या ठार

Published:

इस्त्रायलने हिजबुल्ला  (Hezbollah) संघटनेचा प्रमुख हसन नरसल्लाह मारला गेल्याचा मोठा दावा केला आहे. इस्त्रायल डिफेन्स फोर्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. हमासनंतर हिजबुल्लाचा खात्मा करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलला हे मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे. इस्त्रायली सैन्य दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितलं की आम्ही दहशतवादी संघटना हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह आणि दक्षिणी आघाडीचा कमांडर अली कारची यांच्यासह अन्य कमांडर्सना ठार मारलं आहे.

“हिज्बुल्लाह या दहशतवादी संघटनेचा नेता हसन नसरल्लाह आणि दक्षिणी मोर्चाचा कमांडर अली कारचीसह अन्य कमांडर्सचा खात्मा केलाय” असं आयडीएफ प्रवक्ते डेनियल हगारी यांनी म्हटलं आहे. इस्रायली गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अचूक गोपनीय माहितीच्या आधारावर आमच्या एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी हिज्बुल्लाहच्या सेंट्रल हेडक्वार्टरवर टार्गेटेड हल्ला केला. बेरुतच्या दाहियेह क्षेत्रात एका रेसिडेंशियल बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये मुख्यालय होतं. हिज्बुल्लाहची सीनियर लीडरशिप हेडक्वार्टरमध्ये बसून इस्रायली नागरिकांविरोधात दहशतवादी कारवायांची आखणी करत असताना हा हल्ला झाला.

 Hezbollah नसरल्लाह बद्दल IDF प्रवक्त्याने काय म्हटलं?

“हिज्बुल्लाह चीफ म्हणून हसन नसरल्लाहवर 32 वर्षाच्या कार्यकाळात इस्रायली नागरिक आणि सैनिकांची हत्या तसच हजारो दहशतवादी हल्ल्याच्या योजना आखणीचे आरोप त्याच्यावर होते. जगभरात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी हसन नसरल्लाह जबाबदार होता. विभिन्न देशातील निरपराध नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला. हिज्बुल्लाहमध्ये नसरल्लाह सर्व मुख्य निर्णय घ्यायचा व रणनिती आखायचा” असं डेनियल हगारी यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img