मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा (Senate election) निकाल आज (27 सप्टेंबर 2024) लागणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरकांच्या जागांकरिता मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडले होते. आज या निवडणुकांची मतमोजणी केली जाणार आहे. या 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मुंबईतील राजकीय वर्तुळात वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने सिनेट निवडणूक (mumbai university senate election) ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील युवासेनेने (Yuvasena) वर्चस्व राखले आहे.
आदित्य ठाकरे यांची युवासेना 2018 ची पुनरावृत्ती करणार की अभाविप सिनेट निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार, याचा फैसला आज निकालाच्यावेळी होईल. मुंबई विद्यापीठ फोर्ट येथे सकाळी 9 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 10 जागांसाठी पार पडलेल्या 28 उमेदवार या निवडणुकीत रिंगणात होते.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. सिनेटच्या निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अभाविप यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या १० जागांवरील सिनेट निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या १३,४०६ इतकी आहे. मात्र 24 सप्टेंबरला झालेल्या सिनेट निवडणुकीत एकूण मतदानाच्या फक्त 55 टक्के मतदान झालं.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी युवासेना आणि अभाविपने सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर छात्रभारतीने चार, मनसेनं (MNS) एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून एकही उमेदवार सिनेटच्या निवडणुकीत उतरवण्यात आलेला नाही.
महायुतीत ट्विस्ट! अजितदादांना दिल्लीतून गुडन्यूज
Senate election सिनेट निवडणुकीसाठी अभाविपच्या उमेदवारांची नावे
हर्षद भिडे
प्रतीक नाईक
रोहन ठाकरे
प्रेषित जयवंत
जयेश शेखावत
राजेंद्र सायगावकर
निशा सावरा
राकेश भुजबळ
अजिंक्य जाधव
रेणुका ठाकूर
Senate election ठाकरेंच्या युवासेनेच्या उमेदवारांची नावे
प्रदीप सावंत
मिलिंद साटम
परम यादव
अल्पेश भोईर
किसन सावंत
स्नेहा गवळी
शीतल शेठ
मयूर पांचाळ
धनराज कोहचडे
शशिकांत झोरे
Senate election मतमोजणी कशा पद्धतीने होणार ?
- सिनेट निवडणुकीची मतमोजणीची पद्धत शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीप्रमाणे आहे
- सुरुवातीला मतपत्रिकांची छाननी केली जाईल
- मतपत्रिकांच्या छाननी मध्ये मतपत्रिका वैद्य, अवैध (valid /invalid ठरवल्या जातील )
- मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर कोटा ठरवला जाईल
- पसंती क्रमांकानुसार मतदान झाल्याने त्यानुसारच मतमोजणी पार पडेल
- एकूण 7200 मतपत्रिका आहेत. यामध्ये मतपत्रिकांची छाननी होऊन वैध अवैध मतपत्रिका बाजूला केल्या जातील. त्यानंतर पाच आरक्षित आणि पाच खुल्या प्रवर्गातील जागांसाठी कोटा ठरवला जाईल. कोटा ठरल्यानंतर पसंती क्रमांकानुसार मतमोजणी सुरू होईल. पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीची मतमोजणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली अगदी पारदर्शकपणे होत आहे