21.5 C
New York

Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी जाहीर होणर?

Published:

विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा (Assembly Election) घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील चौदा जणांचं पथक रात्री मुंबईत दाखल झालं आहे. (Election) हे पथक आज शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस केंद्रीय पथक राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत.

Assembly Election परिस्थितीचा आढावा

आयोगाचे अधिकारी आज (ता. २७) सकाळी १० वाजता विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक होणार असून दुपारी तीन वाजता गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलिस महानिरीक्षक, प्रशासकीय विभागाचे विविध सचिव आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतील.

शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोच्या लोकार्पण आता मोदींच्या हस्ते नव्हे तर…

शनिवारी (ता. २९) केंद्रीय निवडणूक पथकाची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्ह्यातील पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांच्यासोबत बैठक होईल. प्रशासनाची प्रशासकीय तयारी, पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून माहिती, आढावा घेतल्यानंतर आयोगाचे पथकाची पत्रकार परिषद होईल. दरम्यान, महाराष्ट्रात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि २० नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल, अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Assembly Election विरोधी स्थिती काय?

विरोधी पक्षात एकूण ७१ आमदार आहेत (महा विकास आघाडी – MVA). 37 आमदारांसह काँग्रेस विरोधी पक्षात सर्वात मोठा पक्ष आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे 16 आमदार आहेत. ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 12 आमदार आहेत. त्याचबरोबर समाजवादी पक्षाकडे दोन, सीपीआयएम आणि पीडब्ल्यूपीआयकडे प्रत्येकी एक आमदार आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे दोन आमदारही विरोधी पक्षात आहेत. तर, विधानसभेच्या 15 जागा रिक्त आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img