18.8 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

महाराष्ट्रात आज दिवसभर पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना आज पाऊस झोडपून काढणार आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगरसह, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंकडून आज जिल्ह्याचा आढावा, ‘मातोश्री’वर बैठ

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांचा आढावा आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी ते जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विधानसभाप्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज चंदगड मतदारसंघाच्या दौऱ्यावर

जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज चंदगड मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. मसणाई मंदिराजवळच्या मैदानात सकाळी साडेअकराला हा कार्यक्रम होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या पवार यांचा दौरा महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे.

 खासदार सुनील तटकरे यांना केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडणार अशा चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने रायगडचे खासदार आणि एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.

लाच घेताना आरटीओ अधिकारी जाळ्यात

महाराष्ट्र सीमेवर वाहनधारकांकडून महाराष्ट्रात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक अमोल खैरनार यासह अन्य एका खासगी व्यक्तीला पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.२५) रात्री रंगेहाथ पकडले.

सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

२०२४ ची मुंबई विद्यापिठाची सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.प्रथमच पोलीस बंदोबस्तात सीसीटिव्हीच्या निगराणीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img