8.3 C
New York

Jayant Patil : महायुतीला अजित पवारांशिवाय पर्याय नाही, जयंत पाटलांचा खोचक टोला

Published:

राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षाने जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधून (Mahayuti) उपमुख्यमंती अजित पवार (Ajit Pawar) बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेसने (NCP) भाजपकडे (BJP) मतांचा ट्रान्सफर केला नाही त्यामुळे लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला असा विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्याने महायुतीमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यामुळे अजित पवार विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधून बाहेर पडणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या प्रकरणात भाष्य करत महायुतीला खोचक टोला लावला आहे. महायुती अजित पवारांना बाजूला करणार नाही कारण तिघांना एकमेकांची गरज आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ते आज राहुरीत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महायुती अजित पवारांना बाजूला करणार नाही कारण या तिघांना एकमेकांची गरज आहे. यामुळे महायुती अजित पवारांना बाजूला करतील अशी कल्पना देखील करणे चुकीचे आहे. तसेच अजित पवार जर बाजूला गेले तर महायुतीची आणखीही वाईट परिस्थिती होईल. येणाऱ्या काळात असलेल्या विधानसभा निवडणुका या महायुतीला अजित पवारांबरोबरच लढवावी लागेल असा खोचक टोला देखील यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला.

मंत्रालयातील गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाची महिलेकडून तोडफोड

तर यावेळी त्यांनी जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्या आरक्षणाबद्दल देखील आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. जरांगे पाटलांचे प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मराठा आंदोलनकर्त्यांनी दिली. जरांगे यांच्या मागण्यासंदर्भात सरकारची नेमकी काय भूमिका आहे याबाबत मराठा आंदोलन करताना आमच्याशी चर्चा केली.

सरकार मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करत आहेत तसेच ओबीसी आरक्षणाबाबत देखील चर्चा करत आहे. सरकार जो काही निर्णय घेईल त्याच्याशी आमचा पाठिंबा राहील अशी जाहीर भूमिका राष्ट्रवादी पक्ष घेत आहे असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img