21.5 C
New York

Maharashtra Rain : राज्यात आज दिवसभर मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Published:

राज्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या परतीच्या (Maharashtra Rain) पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुंबईत तर दोन दिवसांपासून धो धो पाऊस (Heavy Rain) कोसळला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाची हजेरी कोकणतील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होती. आजही पावसाचा मुक्काम कायम राहणार असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा इशारा आजही हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD Rain Alert) आज कोकण, मध्य महाराष्ट्र, पुणे, मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यालाही पाऊस झोडपून काढणार आहे. शनिवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा कहर पाहण्यास मिळत आहे.

Maharashtra Rain ‘या’ जिल्ह्यांनाऑरेंज अन् यलो अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain पुणे-ंमुंबईत धो धो बरसला

अनेक ठिकाणी पुण्यात काल जोरदार पावसाने हजेरी लावली होती. काल दिवसभर पावसाचा जोर होता. त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. नागरी वस्तीत पाणी जमा झाले होते. पुण्याच्या जवळील पिंपरी चिंचवड शहरालाही पावसाने झोडपून काढले. मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अंधेरी सबवेवर दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मुलुंड आणि विक्रोळी पट्ट्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. फास्टट्रॅकवर वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती. तर विक्रोळी ते भांडुप परिसरात ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img