18.2 C
New York

Ulhasnagar : बांगलादेशी पॉर्न स्टार रिया उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख पोलिसांच्या जाळ्यात

Published:

नवनीत बऱ्हाटे


उल्हासनगर :- ठाणे जिल्ह्यातील हिललाइन पोलीस (Ulhasnagar) ठाण्याच्या अधिकार्‍यांनी एक मोठी कारवाई करत बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखला अटक केली आहे. तीने बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवला असल्याचे उघड झाले आहे. आरोपी रिया ही राज कुंद्रा फिल्म्सशी संबंधित असून, तिने प्रसिद्ध पॉर्न स्टार गेहना वशिष्टसोबत अनेक डोबे पॉर्न सीन्स शूट केले होते. ही घटना उघड झाल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संग्राम माळकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने रिया उर्फ आरोही बर्डेला ताब्यात घेतले. तपासा दरम्यान, रियाने बनावट कागदपत्रांच्या आधारावर पासपोर्ट तयार केल्याचे स्पष्ट झाले. तिची ओळख बांगलादेशी नागरिक म्हणून झाली असून, तिला यापूर्वीही वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान रियाच्या कुटुंबातील आणखी काही व्यक्तींची नावे समोर आले आहे, जे बांगलादेशमध्ये वास्तव्यास आहेत आणि ज्यांनी तिला या गुन्ह्यात साथ दिली. सध्या पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे. पोलीस शोधात असलेल्या व्यक्तींची नावे अंजली राजाराम पाटील उर्फ अंजली अरविंद बर्डे उर्फ रूबी शेख (आई – बांगलादेशमध्ये), रवींद्र अरविंद बर्डे उर्फ रियाज शेख (भाऊ – बांगलादेशमध्ये), रितू अरविंद बर्डे उर्फ मोनी शेख (तिची मदत करणारी, तिला बांगलादेशमधून भारतात घेऊन आलेली) आणि अरविंद शामराव बर्डे हा भारतीय नागरिक असून, रिया आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे बनावट कागदपत्र तयार करणारा प्रमुख आरोपी आहे.

‘धारावी पुनर्विकासा’वर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

पोलिसांच्या तपासानुसार, अरविंदने या सर्व मुलांच्या कागदपत्रांवर बाप म्हणून नाव नोंदवले आहे, ज्यामुळे त्यांना भारतात राहणे शक्य झाले. रियाच्या विरोधात आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे की तिने भारतीय नागरिकत्वाचा गैरवापर करून दोन भारतीय नागरिकांविरुद्ध खोटे बलात्कार आणि घरगुती हिंसाचाराचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या गंभीर गुन्ह्यांसाठी पोलीस तिची चौकशी करत आहेत आणि ती आणखी गुन्ह्यांमध्ये सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपास अधिकारी संग्राम माळकर यांनी रियाच्या विरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत, ज्यात IPC कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट कागदपत्रे तयार करणे), 468 (फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर), 471 (बनावट कागदपत्रांचा उपयोग) आणि 34 (सामूहिक गुन्हा) यांचा समावेश आहे. तसेच, परकीय नागरिक कायदा अंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी सुरु ठेवली असून, आरोपींच्या आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img