अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दोषी आढळले आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात खटला दाखल केला होता. कोर्टाने राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. राऊतांविरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी माझगाव कोर्टात याचिका दाखल केली होती. यात राऊतांवर अनेक आरोप करण्यात आले होते. या प्रकरणावर गेल्या काहीद दिवसांपासून सुनावणी सुरू होती. त्यावर आज अखेर माझागाव कोर्टाने निकाल देत राऊतांनी दोषी ठरवले आहे. राऊत दोषी आढळल्याने कोर्टाने राऊतांना 15 दिवासांचा तुरूंगवास आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.
Sanjay Raut राऊत वरच्या कोर्टात जाण्याची शक्यता
राऊतांना दोषी ठरवत न्यायालयाने 15 दिवसांचा तुरूंगवास आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर आता कोर्टाच्या या निर्णयानंतर राऊत वरच्या कोर्टात या निकालाविरोधात अपील करतात का हे पाहणे महत्त्वाच्या ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आला आहे. 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने निकाल दिला आहे. 2022 सालचे हे प्रकरण आहे. मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांनी फडणवीसांवर साधला निशाणा
न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 15 दिवसाची कैद असल्याने संजय राऊत जामीनास पात्र आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. ते स्वत:ला सरेंडर करतील. त्यानंतर कोर्ट त्यांना जामीन मंजूर करण्याची शक्यता आहे. सुनावणीवेळी संजय राऊत कोर्टात उपस्थित नव्हते. परंतु कोर्टाने आपल्या नियोजीत वेळेत निकालाचे वाचन पूर्ण केले आहे.
Sanjay Raut कोर्टाच्या निकालानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं की, आजही भारतातील न्यायव्यवस्था रामशास्त्री प्रभुणे यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. माझ्या कुटुंबावर , माझ्या मुलावर कोणी आँच आणायचा प्रयत्न केला तरी एक सामान्य गृहिणी कशी लढेल, तशीच मी लढले. मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते, या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला, असे वाटते. मी न्यायालयाच्या निकालावर समाधानी आहे. शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करण्याला यामुळे चाप बसेल, अशी प्रतिक्रिया मेधा सोमय्या यांनी व्यक्त केली.