23.2 C
New York

Pune Metro : शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोच्या लोकार्पण आता मोदींच्या हस्ते नव्हे तर…

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज (दि.26) पुणे मेट्रोसह (Pune Metro) इतर विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे काँग्रेसने दंड थोपटत या मेट्रोचे उद्घाटन करण्याची वेळ आणि तारीख जाहीर केली आहे. आम्ही आज मोोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची वाट बघणार आहोत. त्यांनी ऑनलाईन का होईना पण मेट्रोचे उद्घाटन करावे अशी मागणी पुणे काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. ‘मेट्रो आज सुरू केली नाही तर, ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्या (दि.27) सकाळी 11 वाजता मेट्रोचे उद्घाटन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते म्हणाले जर पुणे शहराला मेट्रो 3 वर्षांपूर्वी मिळाली पाहिजे होती मात्र त्याला आठ वर्ष लागली. आम्ही पुणे शहराच्या विकासाला विरोध करत नाही. म्हणून आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट पाहणार आहोत. त्यांनी आज ऑनलाईन का होईना पण मेट्रोचे उद्घाटन करावे. जे आज मेट्रोचे उद्घाटन झाले नाही तर उद्या सकाळी 11 वाजता आम्ही मेट्रोचे उद्घाटन करू आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना मेट्रो रन करण्याची विनंती करणार आहोत आणि जर अधिकाऱ्यांनी मेट्रो रन केली नाही तर उद्यापासून त्यांच्या दालनात बैठा आंदोलन आम्ही करणार आहोत असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. तसेच पुण्यातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते आम्ही मेट्रोचे उद्घाटन करणार आहोत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

मुंबईच्या तुंबईमुळे नागरिकांचे हाल, आदित्य ठाकरेंचा पालिकेवर निशाणा

Pune Metro पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द झाला वाईट वाटलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित पुणे दौरा रद्द झाल्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पावसामुळे मोदींचा नियोजित दौरा रद्द झाला याबद्दल खरचं वाईट वाटलं. पण जरी त्यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझी पंतप्रधान कार्यालयाला विनंती आहे की, त्यांनी शिवाजी नगर ते स्वारगेट तयार झालेल्या मेट्रो मार्ग लवकरात लवकर सुरू करावा. केवळ उद्घाटनासाठी म्हणून तयार झालेला हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या वापरासाठी थांबवून ठेऊ नये.

Pune Metro कसा होता PM मोदींचा पुणे दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यात मोदींचे पुणे विमानतळावर 4 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार होते. त्यानंतर ते शिवाजीनगर स्थानकावर येऊन मेट्रोने शिवाजीनगर ते स्वारगटे असा प्रवास करणार होते. भुयारी मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मोदी वाहनाने स.प महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल होणार होते. येथे मोदींची जाहीर सभा पार पडणार होती.

मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्यात मेट्रोसह एकूण 12 प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. तसेच मोदी भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते. मात्र पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img