राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. मंगळवारी (24 सप्टेंबर) रात्रीपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने बुधवारी दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळ ते रात्रीपर्यंत अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली होती, तर अनेक रस्ते जलमय झाले होते. याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी पालिकेवर निशाणा साधला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, काल पाऊस तीन ते चार तास पडला असेल, पण फक्त अर्धा तासाच्या पावसामध्ये मुंबई ठप्प झाली होती. 2005 ला जशी ढगफुटी झाली होती, त्यानंतर पहिल्यांदाच काल पश्चिम द्रुतगती महामार्ग हा पूर्णपणे भरला होता. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. अशावेळी मुंबई पालिकेचं आणि मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडर जे नागरिकांच्या मदतीला असतं, ते काल कुठे होतं? मुंबईचे पालकमंत्री कुठे होते? मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा यावर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल दोन्हींनी उघड केल्यानंतरही आपण पाहत आहात की, रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत. पण कुठेही अर्धा किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणचं काम झालेलं नाही.
संजय राऊतांनाअब्रुनुकसानीच्या प्रकरणात दिलासा
मुंबई, पुणे आणि ठाणे असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक शहरात गेल्या दोन वर्षात महानगरपालिकेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. महापालिकेला महापौर नाही, नगरसेवक नाहीत, अशावेळी नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे? हा एक प्रश्न पडतोच. पण दुसरी बाजू ही पण आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झालेल्या नसल्या तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, ते चालवत असतात.
Aditya Thackeray गेल्या दोन वर्षात 15 वॉर्ड ऑफीसरची नेमणूक नाही
दरम्यान, शिंदे गटावर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची जी काही टोळी आहे, त्यातील प्रत्येकाला काहीना काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत. कंत्राटामध्ये फक्त वाढ झाली आहे, पण काम कुठेही झालेलं नाही. एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री या महाराष्ट्राने याआधी कधीही पहिले नसतील, किंबहुना देशाने कधी पहिले नसतील. तसेच गेल्या दोन वर्षांपासून आम्ही अजून एक विषय सातत्याने मांडत आहोत. मुंबईसारख्या शहराला दोन वर्षांमध्ये 15 वॉर्ड ऑफीसर नाहीयत. त्यांची नेमणूक व्हायला एवढा वेळ का लागतोय? असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
Aditya Thackeray आपत्कालीन विभागाने फोन उचलला नाही
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही मुंबईतील परिस्थिती आरोप करत महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले की, मुंबईत मुसळधार पाऊस झालेला असताना जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा तातडीच्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील फोन उचलत जात नसल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत मुंबईकरांना सुविधा मिळत नसून याबाबत विभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्तांना विशेष सूचना देण्यात याव्यात, अशी विनंतीही सुनील प्रभू यांनी केली आहे.