3.8 C
New York

Vinesh Phogat : मोठी बातमी! विनेश फोगाटला ‘नाडा’ची नोटीस; प्रकरण काय?

Published:

कुस्तीतून निवृत्ती घेऊन राजकारणात आलेल्या विनेश फोगाटच्या अडचणी (Vinesh Phogat) आणखी वाढण्याची शक्यता आहे. विनेश फोगाटने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (Haryana Elections) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने विनेशला (Congress Party) जुलाना मतदारसंघातून तिकीटही दिले. राष्ट्रीय डोपिंग रोधी एजन्सीने (नाडा) विनेश फोगाटला एक नोटीस धाडली आहे. 14 दिवसांच्या आत या नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. नाडाच्या नोंदणीकृत पूलमध्ये (आरटीपी) नोंदणी केलेल्या सर्व खेळाडूंना डोपिंग चाचणीसाठी केव्हा उपलब्ध असताल याची माहिती द्यावी लागते. या खेळाडूंमध्ये विनेश फोगाटही सहभागी आहे.

डोपिंग चाचणीसाठी एखाद्या खेळाडूने एखादं ठिकाण सांगितलं असेल आणि तोच खेळाडू जर त्या ठिकाणी उपलब्ध राहत नसेल तर माहिती देण्यातील अपयश मानलं जाते. नाडाने नोटीसीत म्हटले आहे की विनेशने तिच्या राहण्याची ठिकाणाची माहिती दिली नाही.

विनेश फोगाट 9 सप्टेंबर या दिवशी सोनिपत येथील खरखौा गावातील तिच्या घरी डोप चाचणीसाठी हजर नव्हती. पॅरिस ऑलिम्पिक्सनंतर विनेशने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश सध्या निवडणूक लढवत आहे. प्रचारात व्यस्त आहे.

दोषी आढळल्यानंतर, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय ?

डोपिंग रोधी नियमानुसार डोप चाचणीसाठी एका अधिकाऱ्याला विनेश फोगाटच्या घरी पाठवण्यात आले होते. परंतु, विनेश उपस्थित नसल्याने अधिकाऱ्याला चाचणी घेता आली नाही असे या नोटीसीत म्हटले आहे. आता विनेशला नियमाचे उल्लंघन केल्याचे स्वीकारावे लागेल किंवा संबंधित ठिकाणी जवळपास एक तास हजर राहिल्याचे पुरावे द्यावे लागतील. येथे सांगावे लागेल की राहत्या जागेसंबंधी विफलता डोपिंग रोधी नियमाचे उल्लंघन नाही. जर एखाद्या खेळाडूने वर्षातून तीन वेळा या नियमाचं उल्लंघन केलं तर नाडा संबंधित खेळाडूवन आरोप लावू शकते.

Vinesh Phogat विनेशच्या एन्ट्रीने राजकारण बदलणार

राजकारणात मोठा बदल विनेश फोगाटची राजकारणातील एन्ट्री राज्याच्या घडवून आणू शकतो. खाप पंचायत आणि शेतकऱ्यांचा फोगाटला असलेला पाठिंबा पाहता निवडणुकीत याचा फायदा मिळू शकतो. विनेश फोगाटला काँग्रेसने तिकीट दिलं आहे. थेट काँग्रेस मुख्यालयात येऊन तिने पक्षात प्रवेश घेतला होता. विनेशने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात पदार्पण केलं आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी ही घटना ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img