12.8 C
New York

Pune Police : पुणे पोलिसांचा घाम फोडणारा ‘हा’ आदेश नेमका काय?

Published:

एकीकडे व्हिडिओला लाईक करून ते शेअर करण्याचे सोशल मीडियावर प्रमाण वाढलेले आहे.(Pune Police) मात्र, आता याच व्हिडिओंला लाईक करणाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी (Pune Police Commissioner) काढले आहेत. त्यामुळे समोर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला डोळे झाकून लाईक करण्यांचे धाबे दणाणले आहेत. (Pune Police On Social Media Video)

Pune Police पदभार स्वीकारताच घेतली होती नामचीन गुडांची परेड

गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पुण्यात गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली आहे. ही गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी आयुक्तालयात शहरातील नामचिन गुंडांची परेड घेत त्यांना सज्जड दम भरला होता.

केजरीवालांचे मोहन भागवतांना पत्र! ‘५’ प्रश्न कोणते?

Pune Police गुंडांच्या सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

ज्यावेळी आयुक्तांनी या गुंडांची परेड घेतली होती. त्यावेळी या सर्वांना रिल्स न बवण्यास अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही जणांनी रिल्स बनवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे समाजात हिरो म्हणून वावरणाऱ्या गुंडाच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे लक्ष असणार आहे.

Pune Police लाईक केलं तरी होणार चौकशी

गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही गुडांकडून वाढदिवसाला तलवारीने केक कापणे, कोयते उगारून दहशत माजवणे आदी प्रकार करत त्याचे रिल्स बनवले जात होते. या व्हिडिओंना अनेकांकडून लाईक केले जात होते. मात्र, आता या प्रकारच्या व्हिडिओंना चुकून जरी लाईक केले तरी पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यापुढे प्रत्येकाला त्यामुळे विचार करुनच त्यावर लाईक, शेअर अन् कॉमेंट करावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img