16.7 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

मोठी बातमी! राजेश टोपे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मंगळवारी जाऊन भेट घेतली. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास राजेश टोपे अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

धनगर आरक्षण आंदोलकांनी‌ घेतले विठ्ठलाचे दर्शन

धनगर आरक्षण आंदोलकांनी आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आज विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर सहा ही उपोषणकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज नगरकडे रवाना झाले. छत्रपती संभाजी महाराज नगर येथील जातपडताळणी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिपक बोराडे,माऊली हळणवर, योगेश धरम आदी आंदोलनकर्ते रूग्णवाहिकेतूनच रवाना झाले.

वक्फ विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती आज मुंबई दौऱ्यावर

वक्फ विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती आज मुंबई दौऱ्यावर

मुंबईत ऐकणार विविध संस्था-समाजघटकांची मतमतांतरे

वक्फ विधेयकावर संसदेची संयुक्त समिती गेले अनेक दिवस अभ्यास, चर्चा करत आहे

देशभरातून १.२ कोटींहून जास्त मत-मतांतरे समितीला प्राप्त झाली आहेत

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात गावगुंडांनी पंधरा-वीस वाहनांची केली तोडफोड केली आहे. तर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावगुंडाने चार-पाच वाहनांची केली तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे.

रोहना नदीला महापूर, बुलढाणा-नागपूर वाहतूक 2 तासांपासून खोळंबली

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. बुलढाणा-नागपूर या महामार्गावरील रोहना गावाजवळील रोहना नदीला पूर आला असून 2 तासापासून वाहतूक खोळंबली आहे. या पावसाने तालुक्यातील पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीरमधील 6 जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांवर मोठ्या उत्साहात मतदान पार पडतंय. दुसऱ्या टप्प्यात 25.78 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील 26 जागांपैकी 15 जागा मध्य काश्मीरमधील आणि 11 जागा जम्मूमधील आहेत.

 तेरणा नदीने ओलांडली धोक्याचे पातळी

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. औसा तालुक्यातील उजनी परिसराला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे तेरणा नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उजनी गावातल्या बाजार चौकात पाणी साचले आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img