16.8 C
New York

Raj Thackrey : विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच मिशन विदर्भ

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अद्याप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर झाली नसली तरी येत्या काही काळातच तारीख घोषित होईल. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असे अंदाज वर्तवले जात असून अवघ्या महिन्या-दीड महिन्यावर आलेल्या निवडणुकीसाठी मविआ आणि महायुती दोन्हींमधील नेते मंडळी, कार्यकर्ते कंबर कसून तयारीला लागले आहेत. त्याशिवाय इतर पक्षांनीही जय्यत तयारी सुरू केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील ॲक्शन मोडवर आले आहेत.

लोकसभा निवडणून न लढवता राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त बाठिंबा दर्शवला होता. मात्र मनसे विधासभा निवडणुकांसाठी सज्ज असून विविध जागांची चाचपणी सुरू आहे. कोणत्या जागेवरून कुणाला उमेदवारी द्यायची याचीही खलबतं सुरू झाली आहेत. राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी मनसे नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलवली होती. यामध्ये विधानसभा मतदारसंघांबद्दल आढावा घेतला गेला. राज ठाकरे यांनी पुढचा प्लानही आता याच पार्श्वभूमीवर आखला असून ‘मिशन विदर्भ’हे त्यांचे आगामी लक्ष्य आहे.

भाजपचा विदर्भातील जागा जिंकण्याचा प्लॅन ठरला?

Raj Thackrey राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच मिशन विदर्भ असून 27 व 28 सप्टेंबर हे दोन दिवस ते अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. 27 तारखेला सकाळी 7.30वाजता राज ठाकरे यांचं अमरावतीत रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्ते जोरदार स्वागत करणार आहेत.

यावेळी विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे हे अमरावतीमध्ये बैठक घेणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, 27 सप्टेंबर रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती,बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा आढाव घेण्यात येणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी नागपूर, वर्धा,भंडारा,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल. तसेच विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जाहीर करणार असल्याचेही वृत्त आहे.

Raj Thackrey राज ठाकरे -मुख्यमंत्र्यांची भेट, बंद दाराआड काय घडलं ?

राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन दिवसांपूर्वीच, सोमवारी ( 23 सप्टेंबर) त्यांनी वर्षा निवासस्थानी भेट झाली. २० मिनिटे बंद दाराआड या भेटीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास चर्चा झाली. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावरून चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच राज ठाकरेंनी राज्यातील विकास कामांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा केल्याची माहिती समोर आली. मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ माजली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img