3.8 C
New York

Arvind Kejriwal : केजरीवालांचे मोहन भागवतांना पत्र! ‘५’ प्रश्न कोणते?

Published:

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. (Mohan Bhagwat) या पत्रामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीपासून इतर अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितलं आहे. हे पत्र त्यांनी राजकीय नेता म्हणून नव्हे केजरीवाल यांनी म्हटलं आहे की, तर एक सामान्य नागरिक म्हणून लिहिलं आहे.

Arvind Kejriwal पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीचा प्रश्न-

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीवर केजरीवाल यांनी पत्रात पहिला प्रश्न विचारला आहे. लालकृष्ण आडवाणी यांना 75 व्या वर्षानंतर निवृत्त केल्याच्या उदाहरणाचा उल्लेख करून, त्यांनी भागवतांना विचारलं की, ‘आडवाणींवर लागू झालेला निवृत्तीचा नियम मोदींवर लागू होणार नाही का?

अमित शाहांचा अजब सवाल; संवाद मेळाव्यात नेमकं काय घडलं?

दुसरा प्रश्न विचारताना केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेल्या नेत्यांवर काहीच काळानंतर भाजपसोबत सरकार बनवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. भ्रष्टाचारी नेत्यांवर आरोप लावून काही दिवसांनंतर त्यांना भाजपमध्ये सामील करून घेणं, हे काय तुम्हाला किंवा आरएसएसला मान्य आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Arvind Kejriwal राष्ट्रीय ध्वजाचा गौरव

केजरीवाल यांनी आपल्या पत्रामध्ये भारतीय लोकशाही आणि तिरंग्याचा मान राखण्याची महत्त्वाची जबाबदारी आपली असल्याचं म्हटले आहे. ‘भारताचा तिरंगा गर्वाने आकाशात लहरावे, हे सुनिश्चित करणं आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, असे केजरीवाल म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img